
संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
माळशिरस
माळशिरस येथील श्रीनाथ विद्यालय व ज्युनियर कॉलेजमध्ये बाल दिंडी काढण्यात आली.
यावेळी सर्व विद्यार्थी, शिक्षक, पालक, संचालक मंडळ यांनी वारकरी संप्रदायचा पोशाख परिधान केला होता. मुलांनी पांढऱ्या रंगाचे शर्ट व पॅन्ट तर मुली नऊवारी साड्या परिधान केल्या होत्या. श्रीनाथ विद्यालयापासून ते अहिल्यादेवी चौकापर्यंत ज्ञानोबा-माऊलीच्या जयघोषात सर्व परिसर विठ्ठलमय झाला होता.अहिल्यादेवी चौकात विद्यालय आयोजित सामाजिक प्रबोधनवर पथनाट्य सादर करण्यात आले.यामध्ये प्लास्टिक, हागणदारी मुक्त, दारुबंदी असे विषय मांडण्यात आले.
मुलांमध्येच एक विठ्ठल-रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम, संत मुक्ताई, संत जनाबाई, संत कान्होपात्रा तयार करुन कपाळी चंदन, अष्टिगंध, बुका लावून टाळ, मृदुंग, भगवे पताके, डोक्यावरती तुळस व वेगवेगळे संदेश देणाऱ्या पाट्या हातात घेऊन बालचंमुचा दिंडी सोहळा एक नवी स्फूर्ती देणाराच वाटत होता.
दिंडी सोहळाचा शेवट विद्यालयात घेण्यात आला.विद्यालयात वेगवेगळे अभंग, मुला- मुलींच्या,पालक, शिक्षक यांच्या फुगड्या, तसेच माऊलीचा घोडा म्हणून विद्यालयात रिंगण घेण्यात आले.विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञान न देता अध्यात्मिक ज्ञानाचे धडे मिळावेत या हेतूने या बालगोपाळांच्या दिंडीचे आयोजन केल्याचे प्राचार्य योगेश गुजरे यांनी सांगितले.
यावेळी संस्थाध्यक्ष डॉ.श्री.आप्पासाहेब देशमुख संस्थेचे संचालक गणपतराव वाघमोडे, महादेव माने, निलेश घाडगे, रावसाहेब देशमुख, धनाजी देवकर, बाबासाहेब माने, नामदेव कोळेकर, हसन मुलाणी, प्राचार्य योगेश गुजरे सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व बहुसंख्य पालकवर्ग उपस्थित होता.


संबंधित बातम्या
मराठी साहित्य मंडळाचा ‘समाजभूषण पुरस्कार’ प्रमोद तरळ यांना जाहीर
माडगुळे येथे उद्या शिदोरी साहित्य संमेलन
चिंचणी यात्रेनिमित्त आटपाडी आगारातर्फे जादा बसगाड्यांचे बुकिंग सुरु