जयंत पाटील हेच दुष्काळी भागाचे खरे भगिरथ-सादिक खाटीक यांचे मत

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी

कृष्णेच्या पाण्यापासून सांगली जिल्ह्यातील एक ही गाव वंचित राहणार नाही असा वज्रनिर्धार करून त्याहृष्टीने माजी जलसंपदा मंत्री श्री . जयंतराव पाटील यांनी सकारात्मक पावले टाकल्यानेच दुष्काळी भागाची कृष्णेच्या पाण्याची स्वप्नपूर्ती होत आहे. असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशचे महासचिव सादिक खाटीक यांनी व्यक्त केले .
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतरावजी पाटील साहेब यांच्या सूचनेनुसार एक तास राष्ट्रवादी साठी” या उपक्रमाच्या माध्यमातून आज आटपाडी येथे सादिक खाटीक यांच्या निवासस्थानी गाव / प्रभाग भेट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . राज्यातल्या सातव्या आणि आटपाडीतल्या सहाव्या गाव – प्रभाग भेटीच्या बैठकीवेळी सादिक खाटीक बोलत होते .
१९९० पासून सलग ३२ वर्षे आमदार, त्यापैकी सत्तेतील २२ वर्षे आणि त्यापैकीच मंत्री पदाची १७ वर्षे आणि विरोधातील आमदारकीची १० वर्षे, वाळवा तालुका, संपूर्ण सांगली आणि राज्याच्या सर्वांगीण, चौफेर विकासासाठी माजी मंत्री जयंतराव पाटील साहेब झगडले आहेत. या ३२ वर्षाच्या कालावधीत दुष्काळी तालुक्यांना पाणी मिळावे म्हणून जयंतराव पाटील यांनी प्रचंड प्रयत्न केले आहेत. अनुशेषाच्या त्रांगड्यातून आपल्या भागातल्या पाणी योजनांवर होत असलेल्या अन्यायातून मार्ग काढण्यासाठीच तत्कालीन राज्यपाल महंमद फजल साहेबांच्या गाडीचे सारथ्य करण्याचे काम जयंतराव पाटील साहेबांनी केले हे सर्वश्रुत आहे . आपल्या राजकीय जीवनाच्या प्रारंभीच वाळवा तालुक्यातील हजारो हेक्टरना पाणी देण्यासाठी लिप्ट इरिगेशन योजना राबविणारे जयंतराव पाटील हे त्यावेळी तिशीतले नेते होते . कृष्णेचे पाणी दुष्काळी भागाला द्यायचे हे लोकनेते राजारामबापू पाटील यांचे अपूरे राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी सत्तेत असताना आणि विरोधात असतानाही जयंतरावांनी टाकलेली पावले, घेतलेला ध्यास, केलेला पाठपुरावा, उभ्या महाराष्ट्राने अनुभवला आहे . लाखोंच्या परिषदेतून खुजगांवला धरण करून दुष्काळी भागाला पाणी देण्याची घोषणा व संघर्ष करणाऱ्या स्व . बापूंच्या स्वप्नपूर्तीसाठीच पर्यायाने दुष्काळग्रस्तांसाठी जयंतराव साहेब सतत झगडले आहेत हे निर्विवाद सत्य आहे . महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षाच्या काळात टेंभू योजनेसाठी ८८० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला गेला असून या योजनेसाठी कोयना धरणातील आठ टीएमसी अतिरिक्त पाणी राखीव ठेवले गेले आहे . हे काम माजी जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांच्या मुळेच शक्य झाले असून यापुढच्या त्यांच्या प्रयत्नातून दुष्काळी भागातील सर्व स्वप्ने पूर्ण होवोत या अपेक्षा मी व्यक्त करतो . असे सादिक खाटीक यांनी स्पष्ट केले .
महिला युवक, युवती, कष्टकरी लोकांच्या हाताला काम मिळावे यासाठी राजारामबापू पाटील उद्योग समुहातील विविध उदयोग आटपाडीत सुरु व्हावेत . यासाठी जयंतराव पाटील साहेबांकडे आपण जोरदार प्रयत्न करणार आहोत अशी भावना ही सादिक खाटीक यांनी बोलुन दाखविली .
महिला, युवक, युवती आणि अकुशल कामगार, मजुर यांच्या उपजिवीकेसाठी विविध महिला उद्योग, लिज्जत पापड युनिट , शेतमालावर प्रक्रिया करणारे उदयोग, गारमेंट, वेगवेगळी कारखानदारी आटपाडी येथे निर्माण व्हावी, या मागण्या यावेळी पुन्हा उपस्थित करण्यात आल्या .
गेल्या सहा बैठकामध्ये मोठ्या प्रमाणावर स्त्रिया, पुरुष, तरुण, तरुणी येताहेत . त्यांच्या हाताला काम मिळावे म्हणून ठोस उपाय योजना झाली पाहीजे . गावातील सुचविलेली कामे मार्गी लागली पाहीजेत . यादृष्टीने सकारात्मक पावले टाकली जावीत अशा भावना श्री . सिद्धनाथ देवस्थान ट्रस्ट मायणीचे चेअरमन आणि राष्ट्रवादीचे माण – खटाव – आटपाडीचे नेते विकासराव देशमुख यांनी व्यक्त केल्या .
आटपाडीतील शंकरराव हाके यांचे घर राजेंद्र पांडुरंग जाधव यांचे घरा दरम्यानची गटर बंदिस्त करून या बोळात पेव्हींग ब्लॉक द्वारे रस्ता बनवला जावा आणि बोळात लाईटची व्यवस्था केली जावी अशी मागणी श्रीमती शाबेरा आब्बास बेपारी आणि सौ रेश्मा बंडगर यांनी पुन्हा केली.
प्रारंभी स्वागत सौ . सुमैय्या मोहसीन तांबोळी यांनी केले .प्रास्तावीक सौ . मुमताज असिफ खाटीक यांनी केले .
यावेळी श्री . सिध्दनाथ देवस्थान ट्रस्ट मायणीचे चेअरमन राष्ट्रवादीचे नेते विकासराव देशमुख, सामाजीक कार्यकर्ते दिलावर शेख, बाळासाहेब उर्फ सलीम वंजारी, महावीर कासार, शंकररावआबा हाके, जितेंद्र साळुंखे – पाटील , रियाज शेख, सोमनाथ ढोबळे, नदिम खाटीक, सौ. सुमैय्या तांबोळी, सौ. रेश्मा बंडगर, सौ . मुमताज खाटीक, श्रीमती शाबेरा बेपारी, श्रीमती रशिदा खाटीक, सौ . राबीयाँबसरी खाटीक, सौ .फरहीन खाटीक, सौ. रुक्साना शिकलगार, रूपाली बुधे, श्रीमती शांताबाई लांडगे, सौ . शबनम शेख , सौ .नसिमा शेख सौ .शुभांगीताई जवळे , सौ .आरबिना खाटीक , इत्यादी अनेक जण उपस्थित होते. शेवटी आभार रियाज शेख यांनी मानले .