काय रिस्पॉन्स! काय निष्ठा! काय गर्दी! सारं ओके हाय !

अsहं,यंदा हॅट्रिकच होणार! पुरोगामी सेवा मंडळाचे हैबतराव पावणे यांच्यासह २१ उमेदवारांचा विजय निश्चित – अध्यक्ष संजय कबीर
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी

सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँक निवडणुकीत पुरोगामी सेवा मंडळाचे आटपाडी तालुका सर्वसाधारण गटाचे उमेदवार हैबतराव पावणे यांच्यासह २१ उमेदवारांचा विजय निश्चित असल्याचा दृढ विश्वास समितीचे आटपाडी तालुका अध्यक्ष संजय कबीर यांनी व्यक्त केला.
ते म्हणाले,आटपाडी तालुक्यातील बहुतांशी शिक्षक बंधू-भगिनी यांचा स्पष्ट कौल पुरोगामी सेवा मंडळाच्या बाजूने आहे. आजपर्यंत शिक्षक बँक सांगली यांनी केलेल्या चांगल्या कामाच्या जोरावर व ऐतिहासिक निर्णयावर सामान्य शिक्षक सभासदांचा ठाम विश्वास असून इथून पुढच्या काळात पारदर्शी कारभार व सर्व कर्जाचा एक अंकी व्याजदर करण्यासाठी व उच्चतम लाभांश देण्यासाठी तसेच मयत कर्जदार सभासदांसाठी संपूर्ण कर्जमाफी यासारख्या अनेक योजना राबवणारे पुरोगामी सेवा मंडळ यांच्या पॅनेलला विमान या चिन्हावर शिक्का मारून मत रुपी आर्शिवाद द्यावा व आपण तो द्याल अशी अपेक्षा आणि तुमच्या सर्वांच्या साथीने विजय निश्चित आहे असे चित्र तालुकाभर सभासदांच्या भेटीगाठी दरम्यान दिसून आले. यावेळी माजी सरचिटणीस नानासाहेब झुरे, रुग्णालयाचे संचालक श्रीकांत कुंभार, बाबासाहेब शेख, शाम ऐवळे, प्रवीण बाड, उन्मेश शेटे,हरिभाऊ जावीर,रमेश विभुते,जोतीराम सोळसे, इन्ताब इनामदार, विजय पवार, सत्यवान माने, दिनेश माने, भिमराव सावंत, किशोर पिसे, सिराज तांबोळी, सत्यजीत भांबुरे, चंद्रकांत गवळी, जगदीश खाडे, बापूसाहेब औंधकर, सचिन म्हेत्रे, सर्जेराव पुजारी ,सतीश पुसावळे, बाळासाहेब वाघमारे, विनोद पुंड, विजय वाघमारे, आदि शिक्षक बांधव उपस्थित होते.