सभासदांचे हित,काटकसर,बँकेचे स्थैर्य यासाठीच प्रामाणिकपणे काम करणार – हैबतराव पावणे

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी

सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी आटपाडी तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यातही सध्या जोरदारपणे सुरू आहे.यानिमित्ताने सभासदासमोर बोलताना पुरोगामी सेवा मंंडळाचे उमेदवार हैबतराव जयवंंत पावणे यांनी सभासदांना आश्वासित केले की,पुरोगामी सेवा मंडळ सत्तेत येताच सर्वच कर्जाचे व्याजदर एक अंकी करणार,मयत सभासदास संपूर्ण कर्जमाफी, दोन अंकी लाभांश देण्याचा प्रयत्न करणार,शिक्षकांसाठी मेडिक्लेम योजना राबवणार, डीसीपीएस बांधवांसाठी भरीव आर्थिक तरतूद करणार, शिक्षकांच्या पाल्यांसाठी शैक्षणिक कर्ज सुविधा उपलब्ध करून देणार, शुभमंगल योजना आणणार, यासारख्या अनेक सभासद हिताच्या योजना राबवणार असल्याचे सांगितले.
यावेळी अध्यक्ष संजय कबीर, सरचिटणीस नानासाहेब झुरे, दिपक कुंभार, भास्करराव डिगोळे, यशवंत मोरे,विठ्ठलपंत माळी, दिनेश माने, हरि जावीर, बाळासाहेब साळुंखे, रवींद्र सावंत, सुभाष सुतार,सचिन त्रिगुणे, सचिन सासणे, संतोष पिसे, भिमराव शिंदे, आदि सभासद व शिक्षक बांधव उपस्थित होते.