अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
जत
जत तालुका शिवसेनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेण्यात आला. जत तालुका शिवसेना पदाधिकारी यांची जत येथील विश्रामगृहात बैठक झाली. यावेळी मंत्री एकनाथ शिंदे यांचा निषेध करण्यात आला.
या बैठकीला शिवसेना तालुकाप्रमुख (पश्चिम) संजय सावंत, शिवसेना तालुकाप्रमुख अंकुश हुवाळे, (पूर्व) तालुका संघटक बंटी दुधाळ, शिवसेना जिल्हा उपप्रमुख तम्मा कुलाळ, युवा सेनेचे तालुकाध्यक्ष सचिन मदने, सम्मा कुलाळ, नागनाथ मोठे, जत शहर प्रमुख विजय राजे चव्हाण, प्रवीण आवरादी, रफिक शेख,शिवाजी पडोळकर, भारत गुळवे, रोहीत स्वामी, ज्ञानेश्वर धुमाळ, श्रीमंत कर्पे, संजय माळी, अनिल पवार, राहूल पाटील, पप्पू
चव्हाण यांच्यासह निष्ठावंत शिवसैनिक उपस्थित होते.
यावेळी तालुकाप्रमुख अंकुश हुवाळे म्हणाले,माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठ्या प्रमाणात विकास कामे केली आहेत. एकनाथ शिंदे यांच्या सारख्या नेत्याला त्यांनी मोठ्या प्रमाणात पदे दिले आहेत. त्यानी पुकारलेले बंड मागे घ्यावे असे आवाहन त्यांनी केले. येणाऱ्या काळात जत तालुक्याच्या ग्रामीण भागात शिवसेना भक्कम करणार असल्याचे सांगितले.
तर तालुकाप्रमुख संजय सावंत म्हणाले की, शिवसेना मोठ्या ताकदीने उभारली आहे. आपण सर्वजण राजकीय विठ्ठल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभे राहुया असे आवाहन संजय सावंत यांनी केले. तालुका संघटक बंटी दुधाळ म्हणाले की शिवसेनेने ऐंशी टक्के समाजकारण व वीस शिवसेना टक्के राजकारण केले आहे. येणाऱ्या काळात जत तालुक्याच्या ग्रामीण भागात शिवसेना भक्कम करणार असल्याचे सांगत. जत विधानसभा मतदारसंघात भगवा फडकवण्यासाठी सज्ज राहा असे ते म्हणाले तर युवा सेनेचे तालुकाध्यक्ष सचिन मदने, जत शहर प्रमुख विजय राजे चव्हाण, प्रविण आवरादी यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.कार्यकर्त्यांनी शिवसेना अंगारे बाकी सब भंगार अशा घोषणा दिल्या.

संबंधित बातम्या
घाणंद ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रविण कदम बिनविरोध
अजनाळे ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता
आटपाडी येथे भाजपाच्या वतीने महाविकास आघाडीचा पुतळा दहन करून आंदोलन