
आपले चांगले निर्णय सभासदांपर्यंत पोहोचवण्यासाठी संपर्क कार्यालय उपयोगी-चेअरमन यु.टी.जाधव
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी
पुरोगामी सेवा मंडळाचे आटपाडी तालुका उमेदवार हैबतराव पावणे यांच्या शिक्षक बँक निवडणूक प्रचार कार्यालयाचे मोठ्या दिमाखात उद्घाटन करण्यात आले.
प्रचार कार्यालय उद्घाटनाच्या कार्यक्रमास तालुक्यातील शिक्षक बंधूनी उदंड प्रतिसादांमध्ये सहभाग घेतला. या कार्यालयाचे उद्घाटन फीत कापून व श्रीफळ वाढवून शिक्षक समितीचे ज्येष्ठ सेवानिवृत्त नेते श्री सखाराम कुंभार (तात्या) यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांच्या समवेत शिक्षक बँकेचे चेअरमन यु.टी.जाधव, उमेदवार हैबतराव पावणे, रुग्णालयाचे संचालक श्रीकांत कुंभार, अध्यक्ष संजय कबीर,सरचिटणीस नानासाहेब झुरे, नेते जयवंत बंडगर, शाम ऐवळे, प्रवीण बाड, अजय राक्षे, रमेश हेगडे, कार्याध्यक्ष विजय पवार, सत्यजीत भांबुरे, कोषाध्यक्ष इन्ताब इनामदार, प्रसिद्धीप्रमुख भास्करराव डिगोळे, दीपक कुंभार, सत्यवान माने, बाळासाहेब साळुंखे, दरिबा बजबळकर, दिनेश माने, चंद्रकांत गवळी, विठ्ठलपंत माळी, पांडुरंग ऐवळे, राजेंद्र कांबळे, शशिकांत माळी, सतीश मदने, नानासाहेब गिरी, सर्जेराव पुजारी, सुभाष सुतार, रवींद्र सावंत, जगदीश खाडे, बाळासाहेब ठोंबरे, काकासाहेब पाटील, धम्मदीप बनसोडे, अजिनाथ आंधळे, यशवंत मोरे, शिवाजी खताळ, दादासाहेब लोखंडे, स्वामी महाराज,आदि बहूसंख्येने शिक्षक बांधव उपस्थित होते.
संजय कबीर यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. उद्घाटन प्रसंगी यु.टी.जाधव म्हणाले, निवडणूक प्रचार कार्यालयाचा उपयोग सामान्य शिक्षक सभासदाच्या हितासाठी करावा व आपण गेली दहा वर्षे जे चांगले निर्णय घेतलेले आहेत,ते शिक्षकांपर्यंत पोचवणे हा या प्रचार कार्यालयाचा प्रमुख उद्देश आहे. सर्वानी सजग राहून आपले पुरोगामी सेवा मंडळाचे पॅनेल निवडून आणुया असा निर्धार केला.
माजी अध्यक्ष श्याम ऐवळे यांनी विरोधकांच्या कोणत्याही भूलथापा, आमिष, अफवा यावरती विश्वास ठेवू नये,असे आवाहन केले.
प्रवीण बाड यांनी निवडणूक प्रचार सूक्ष्म नियोजन याविषयी मार्गदर्शन केले.
प्रमुख पाहुणे श्री सखाराम तात्या कुंभार गुरुजी यांनी उपस्थित सर्व शिक्षक बांधवांना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या व हैबतराव पावणे यांच्यासह २१ उमेदवार यांना निवडून आणण्याचे आवाहन केले आणि विमान हवेतून फिरू दया अशा शुभेच्छा दिल्या. आभार प्रदर्शन नानासाहेब झुरे यांनी केले.
यावेळी जिव्हाळा फाऊंडेशनचे अध्यक्ष व भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे उत्तमराव बालटे यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला. यावेळी कल्याण काळे उपस्थित होते.


संबंधित बातम्या
घाणंद ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रविण कदम बिनविरोध
अजनाळे ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता
आटपाडी येथे भाजपाच्या वतीने महाविकास आघाडीचा पुतळा दहन करून आंदोलन