शिवाजीराव पाटील शिक्षक संघ(माधवराव पाटील)गटाचा पुरोगामी सेवामंडळाला बिनशर्त पाठिंबा जाहीर

स्वाभिमानीच्या नावाखाली बेईमानी करणाऱ्यांना धडा शिकविण्यासाठी शिवाजीराव पाटील शिक्षक संघ (माधवराव पाटील)गटाचा पुरोगामी सेवामंडळाला बिनशर्त पाठिंबा जाहीर
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
सांगली

सांगली येथे झालेल्या पत्रकार परिषदेत शिवाजीराव पाटील शिक्षक संघाचा शिक्षक समिती पुरस्कृत पुरोगामी सेवा मंडळाला पाठिंबा जाहीर करण्यात आला असल्याची माहिती सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे चेअरमन यु.टी.जाधव यांनी दिली.
यावेळी शिक्षक संघाचे नेते माधवराव पाटील यांनी सांगितले की, ज्यांनी आयुष्यभर शिवाजीराव पाटील यांच्या नावावरती स्वतःच्या पोळ्या भाजल्या व त्यांच्या हयातीनंतर मात्र त्यांच्या नावाचा वापर करून मतांचा जोगवा मागण्यासाठी टपलेल्या टोळीला नेस्तनाबूत करण्यासाठी पुरोगामी सेवा मंडळाला सभासदांच्या हितासाठी बिनशर्त पाठिंबा जाहीर केल्याचे सांगितले.
यावेळी शिक्षक समितीचे राज्य नेते विश्वनाथ मिरजकर, नेते सुर्यकांत पाटील, माजी राज्य कार्याध्यक्ष किरणराव गायकवाड, राज्य संघटक सयाजीराव पाटील, पार्लमेंटरी बोर्ड अध्यक्ष किसनराव पाटील ,सचिव शशिकांत भागवत, शिक्षक संघ पार्लमेंटरी बोर्ड अध्यक्ष विकासराव शिंदे, सचिव वसतराव सावंत , धनंजय पाटील कायदेशीर सल्लागार , शिक्षक बँक चेअरमन यु.टी.जाधव ,संचालक रमेश पाटील, शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष मुकुंदराव सूर्यवंशी ,जिल्हा सरचिटणीस सुनीलराव गुरव ,शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष माणिकराव पाटील ,मिरज नेतेअध्यक्ष सुरेश पवार, सरचिटणीस माणिकराव माळी , मिरज अध्यक्ष दयासागर बन्ने, वाळवा अध्यक्ष बाजीराव पाटील गुंडा मुंजे जत , संतोष गुरव जिल्हा उपाध्यक्ष, अशोक परीट मिरज, अजित जाधव वाळवा खानापूर मनपा नेते सुरेश कोळी सांगली मनपा अध्यक्ष सुरेश शिंगाडे, जिल्हा उपाध्यक्ष संतोष गुरव ,आटपाडी तालुकाध्यक्ष जगन्नाथ जाधव, सरचिटणीस शांताराम यादव आदी उपस्थित होते.