

अनेक संघटनांनी दिला पाठिंबा
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
औदुंबर/सांगली
सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीमधील, शिक्षक समिती, शिक्षक भारती संघटना व खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघ पुरस्कृत पुरोगामी सेवा मंडळ पॅनेलचा प्रचार शुभारंभ कार्यक्रम औदुंबर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी अनेक मान्यवर शिक्षक नेते व कार्यकर्त्यांनी शिक्षक समितीमध्ये प्रवेश केला, तसेच पुरोगामी सेवा मंडळ पॅनेलला पाठिंबा व्यक्त केला. यामध्ये जुनी पेन्शन संघटनेचे गुणवंत विधाते, चौगुले सर, संजय रोकडे, सुभाष हुवाळे, अविनाश सुतार यांच्यासह जवळजवळ ७० डी सी पी एस धारक शिक्षक, सांगली जिल्हा आदर्श शिक्षक संघटनेचे जिल्हा सरचिटणीस शहाजी साळे व त्यांचे सर्व कार्यकर्ते, मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष शांतेस शिंगळे यांनी पुरोगामी सेवा मंडळ पॅनलला जाहीर पाठिंबा दिला व समितीमधे प्रवेश केल्याचे जाहीर केले. त्यामुळे पुरोगामी सेवा मंडळ पॅनलच्या विजयाचा मार्ग सुकर झाला आहे.
यावेळी पॅनेलचे नेते तसेच सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीचे अध्यक्ष अनिल बापू कादे,नाना जोशी,राज्य अध्यक्ष उदय शिंदे, राज्यनेते काळुजी बोरसे पाटील, राज्य नेते विश्वनाथ आण्णा मिरजकर, शिक्षक समितीचे प्रवक्ते सुरेश पवार, किरणराव गायकवाड, किसनराव पाटील, महिला जिल्हाध्यक्ष सुनिता चौगुले, विकास चौगुले, आप्पासाहेब दळवी ,पा.बा.पाटील,अरविंद गावडे, माणिकराव पाटील, शशिकांत भागवत ,सयाजीराव पाटील, चेअरमन यु.टी. जाधव, व्हाईस चेअरमन राजाराम सावंत, जिल्हा पार्लमेंटरी बोर्ड सदस्य आर.आर.सावंत आदिंसह पॅनेलचे सर्व नेते व उमेदवार तसेच शिक्षक सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमप्रसंगी बोलताना अनेक शिक्षक नेत्यांनी विजयाची हॅट्ट्रीक होणारच असा विश्वास व्यक्त केला.किरण गायकवाड यांनी प्रास्ताविक व स्वागत केले, संभाजी पाटील यांनी सूत्रसंचालन केले. रमेश कोट्याळ यांनी आभार मानले.


संबंधित बातम्या
घाणंद ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रविण कदम बिनविरोध
अजनाळे ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता
आटपाडी येथे भाजपाच्या वतीने महाविकास आघाडीचा पुतळा दहन करून आंदोलन