शिक्षक बँक निवडणुकीत पुरोगामी सेवा मंडळाचा उद्या रविवारी औदुंबर येथे प्रचार शुभारंभ

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी/सांगली

सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पुरोगामी सेवा मंडळ सांगलीच्या २१ उमेदवारांचा प्रचाराचा शुभारंभाचा कार्यक्रम श्री क्षेत्र औदुंबर येथे उद्या रविवारी सकाळी १०.३० वाजता आयोजित केला आहे. यासाठी आटपाडी तालुक्यातून बहुसंख्य प्राथमिक शिक्षक बंधू-भगिनींनी उपस्थित रहावे, असे आवाहन आटपाडी तालुका प्राथमिक शिक्षक समितीचे अध्यक्ष संजय कबीर यांनी केले आहे.
पुरोगामी सेवा मंडळ अंतर्गत प्राथमिक शिक्षक समिती, शिक्षक भारती, खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघ यांनी एकत्रितपणे प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले आहे. पुरोगामी सेवा मंडळाच्या २१ उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीचे अध्यक्ष अनिल(बापू) कादे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे अध्यक्ष उदय शिंदे, समितीचे राज्य नेते विश्वनाथअण्णा मिरजकर व काळुजी बोरसे पाटील, माजी राजाध्यक्ष नाना जोशी, शिक्षक नेते एस. आर. आबा पाटील, शिक्षक भारतीचे राज्य अधक्ष नवनाथ गेंड, समितीच्या महिला राज्याध्यक्ष सौ. वर्षाताई केनवाडे, कार्याध्यक्ष राजेंद्र नवले, खाजगी शिक्षक महासंघाचे राज्य उपाध्यक्ष एम.डी. पाटील, शिक्षक समितीचे माजी राज्य कोषाध्यक्ष किरणरावजी गायकवाड, खाजगी शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंद गावडे,पार्लमेंटरी बोर्डाचे अध्यक्ष किसनराव पाटील, समितीचे जिल्हाध्यक्ष माणिकराव पाटील, पार्लमेंटरी बोर्डाचे सचिव शशिकांत भागवत, शिक्षक बँकेचे माजी चेअरमन संपतराव चव्हाण, समितीचे जिल्हा सरचिटणीस हरिभाऊ गावडे, राज्य संघटक सयाजीराव पाटील, राज्य प्रसिद्धीप्रमुख पप्पू मुलाणी, महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ. सुनिता चौगुले पाटील, विभाग प्रमुख प्रमोद कोडक, शिक्षक भारतीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष अरुण नागणे, केंद्रप्रमुख संघटनेचे नेते अविनाश जकाते, कार्यकारी अध्यक्ष मनोज चव्हाण, महानगरपालिका क्षेत्राचे अध्यक्ष म.ज. पाटील, बँकेचे व्हाईस चेअरमन राजाराम सावंत, शिक्षक बँकेचे चेअरमन यु.टी.जाधव, शिक्षक भारती पार्लमेंटरी बोर्डाचे सरचिटणीस दीपक काळे, पार्लमेंटरी बोर्डाचे अध्यक्ष कादर आत्तार, सदस्य नंदकुमार पाटील, उर्दू शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष अशरफ मोमीन प्रमुख पाहुणे आहेत.
प्रचार शुभारंभ कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा शिक्षक नेते बाबासाहेब लाड यांनी केले आहे.
आटपाडी तालुक्यातून बहुसंख्येने प्राथमिक शिक्षक या प्रचार शुभारंभ कार्यक्रमासाठी जाणार असून याबाबतचे नियोजन केले असल्याची माहिती अध्यक्ष कबीर यांनी दिली.