पुरोगामी सेवा मंडळाचा झंजावती निवडणूक प्रचार सुुरु!

हैबतराव पावणे यांच्या प्रचाराचा खरसुंडीत शुभारंभ!
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी

सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँक निवडणूक सन 2022-2027 च्या पुरोगामी सेवा मंडळाच्या आटपाडी तालुक्याचे उमेदवार हैबतराव पावणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ खरसुंडी येथे करण्यात आला.आटपाडी तालुक्यातील अनेक प्राथमिक शिक्षक-शिक्षिका यांच्या अलोट व उत्स्फुर्त गर्दीमध्ये खरसुंडी सिद्धनाथ, जोगेश्वरी घोडेखूूर नगरीत तमाम शिक्षक समिती सैनिक व महिला आघाडी तसेच कवठेमंकाळचे उमेदवार मनोज कोळेकर,तासगावचे उमेदवार श्रीकांत शिंदे ,कृष्णा पोळ यांच्या समवेत प्रचाराचा शुभारंभ श्रीफळ वाढवून करण्यात आला.
शिक्षक बँकेचे विद्यमान चेअरमन यु. टी. जाधव, माजी चेअरमन शिवाजीराजे पवार, शशिकांत बजबळे, माजी संचालक सिद्धार्थ कटरे, धनाजी देठे, सहकारी रुग्णालयाचे संचालक बाबासाहेब शेख, श्रीकांतराजे कुंभार, तालुकाध्यक्ष संजय कबीर, सरचिटणीस नानासाहेब झुरे व आदी मान्यवर उपस्थित होते.
पुरोगामी सेवा मंडळ, शिक्षक भारती, खासगी प्राथमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी महासंघ यांच्या पॅनेलला प्रचंड बहुमताने निवडून देण्याचे अभिवचन सर्वांनी व्यक्त केले .