अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
जत
जत शहरातील विविध विकासकामांसाठी ४ कोटींचा निधी मंजूर करून आणल्याची माहिती आ.विक्रमसिंह सावंत यांनी जत पत्रकार बैठकीमध्ये दिली.
शहराची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता डांबरीकरणासाठी ३० लाखांचा निधी मंजूर केला आहे.तसेच त्याबरोबर गेल्या अनेक वर्षापासून सोलनकर चौक ते बसवेश्वर चौक या रस्त्यावर दुभाजक बसविण्याची मागणी होत होती.या रस्त्यावर वारंवार अपघात होत होते.ही गरज लक्षात घेऊन दुभाजकासाठी ५० लाखांचा निधी मंजूर करून आणला असून त्याचबरोबर १० सामाजिक सभागृह बांधणेकामी १५० लाखांचा निधी मंजूर केला आहे. त्याचबरोबर जत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक,यल्लम्मा देवी कमान,सोलनकर चौक,बसवेश्वर चौक,गणपती मंदिर चौक उमराणी रोड व गांधी चौक हे चौक सुशोभीकरण करण्याबरोबर जत शहरातील सोलनकर चौक येथे पोलीस चौकी बांधणे कामी ५७ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. जत शहरातील राजारामनगर चैतन्य कॉलनी,कोळी घरासमोरील कोळी प्लॉट,अभिमन्यू मासाळ घराजवळील ओपन स्पेस व केंचराया मंदिराजवळ ओपन विकसित करणे, तसेच जिम व तारेच्या संरक्षण भिंतीसाठी ४८ लाखांचा निधी मंजूर झाला आहे.
दुधाळ वस्ती ते अंबाबाई मंदिर पादुका १५० मी.रस्ताडांबरीकरण करणे व इदगाह मैदान ते नाटेकर घर ते गेस्ट हाउस मागील बाजू इनुस मकानदार घर रस्ता डांबरीकरण करणे, या दोन्ही कामांसाठी २३ लाखांचा निधी मंजूर केला आहे.फोरेस्ट रोपवाटिका जवळील सार्वजनिक स्वच्छता गृहाकडे जाणारा सिमेंट कॉंक्रीट रस्ता करणे या कामासाठी १० लाखांचा निधी तसेच अचकनहळ्ळी रोड ते गावडेवस्ती ते शेगाव रोडकडे जाणारा रस्ता डांबरीकरण करणे, या कामासाठी १० लाखांचा निधी,चरकी घर ते अंगणवाडीपर्यंत ट्रायमिक्स रस्ता व जत शहरातील डोळ्ळी गल्ली अंतर्गत ट्रीमिक्स रस्ता करणेसाठी एकूण २२ लाखांचा निधी मंजूर झाला असून जत शहराचा चौफेर विकास करणे, हेच उद्दिष्ट असून तसेच जत शहराला वरदान ठरणाऱ्या नळ पाणी पुरवठा योजनेसाठी पाठपुरावा सुरु असून तोही पाणी प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे. त्यामुळे जत शहरवासियांना मुबलक पाणी पुरवठा होणार आहे,असल्याचे आ.विक्रमसिंह सावंत यांनी सांगितले.

संबंधित बातम्या
घाणंद ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रविण कदम बिनविरोध
अजनाळे ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता
आटपाडी येथे भाजपाच्या वतीने महाविकास आघाडीचा पुतळा दहन करून आंदोलन