मांडवे ग्रामपंचायत निवडणुकीत गावानं अन् चिठ्ठीच्या रूपान, देवानं नाकारलं,त्यांनी थांबणं गरजेचं होतं
संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
माळशिरस
पंचवार्षिक निवडणूक २०२१ निवडणूक पार पडली आणि त्यानंतर विरोधकांनी ज्याप्रमाणे जनतेच्या मताचा अनादर करत स्वतः हुशार असल्याचा अविर्भाव आणत मुंबई हायकोर्टापर्यंत धनाचा वापर करून मांडवे मतदारांवर पोटनिवडणूक लादण्याचे मोठे पापकृत्य केलं. परंतु सत्ता जय श्रीराम पॅनलची आल्यानंतर युवा पिढीने जे काम विरोधकांना दहा वर्षात जमले नाही, ते करून दाखवले. विरोधकांनी दहा वर्षात साधा अर्धा किलोमीटर रस्त्या डांबरीकरण केला नाही. परंतु युवा पिढीच्या पाठपुराव्यामुळे एका वर्षात दोन किलोमीटर डांबरी केला. लागेल त्याठिकाणी विद्युतीकरण, पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन आणि व्यवस्थापन,कोरोना कालावधीमध्ये युवापिढीने जीवाची बाजी लावून तालुक्यातील सगळ्यात जास्त लसीकरण करणारे गाव म्हणून मिळवलेला बहुमान याच्या जोरावर पोटनिवडणुकीमध्ये आमचा विजय निश्चित आहे, असे मत पुष्पा हनुमंत पालवे यांनी व्यक्त केले.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, ज्यांना खाल्ल्या भाकरीची जाण नाही, ते जनतेच्या मनाची आणि मताची काय जाण ठेवणार? त्यांना निवडणूक लढयचीच होती तर त्यांनी स्वतः मैदानात उतरणे गरजेचं होतं. गावात वेगानं चाललेल्या विकासकामांना खीळ घालण्यासाठी त्यांनी हा रचलेला सर्वात मोठा डाव आहे.परंतु जनता आणि मतदार सुज्ञ आहेत,त्यांचा हा डाव हाणून पाडल्याशिवाय राहणार नाहीत. विरोधकांना ग्रामपंचायतीची सत्ता स्वतःचं घर चालवण्यासाठी हवी आहे. गावाच्या विकासाच कोणतेही सोयरसुतक त्यांना नाही. ज्यांना गत निवडणुकीत गावाने आणि चिट्टीच्या रुपाने देवाने नाकारलं, त्यांनी किमान पाच वर्ष आमच्या विकासाच्या दिशा किती मोठी आहे, हे पाहणं गरजेचं होतं,असे त्या म्हणाल्या.

संबंधित बातम्या
घाणंद ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रविण कदम बिनविरोध
अजनाळे ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता
आटपाडी येथे भाजपाच्या वतीने महाविकास आघाडीचा पुतळा दहन करून आंदोलन