आटपाडीतून शिक्षक समितीच्या वतीने प्राथमिक शिक्षक बँक निवडणुकीसाठी तिघाजणांचे उमेदवारी अर्ज दाखल

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी/सांगली

सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शिक्षक समितीच्या वतीने आटपाडी तालुक्यातून नामनिर्देशनाचे तीन उमेदवारी अर्ज उत्साहात दाखल करण्यात आले. प्राथमिक शिक्षक बँकेचे चेअरमन यु .टी.जाधव, जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक हैबतराव पावणे व समितीचे माजी तालुकाध्यक्ष शामराव ऐवळे यांचा समावेश आहे.
सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेची पंचवार्षिक निवडणूक सन २०२२-२७ जाहीर झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी आपले नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.आटपाडी तालुक्यातून प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने मध्यवर्ती प्रशासकीय इमारत,सांगली जिल्हा निबंधक सहकारी संस्था येथे आटपाडी तालुक्यातून तिघाजणांचे नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यात आले.
जिल्हा राखीव नागरीकांचा मागास प्रवर्ग गटातून शिक्षक बँकेचे चेअरमन यु.टी.जाधव व तालुका सर्वसाधारण गटातून हैबतराव पावणे व जिल्हा राखीव अनुसूचित जाती गटातून व तालुका सर्वसाधारण गटातून शामराव ऐवळे या तिघा इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.
आटपाडी तालुका प्राथमिक शिक्षक समितीचे तालुकाध्यक्ष संजय कबीर, सरचिटणीस नानासाहेब झुरे, नेते प्रकाश विभुते,सिद्धार्थ कटरेधनाजी देठे,सिराज तांबोळी ,दिपक कुंभार,प्रवीण बाड,जयवंत बंडगर,सचिन देठे, बाळासाहेब साळुंखे,श्रीकांतराजे कुंभार,शिवाजी खताळ , रमेश हेगडे,हरिदास जावीर,सत्यवान माने,विजय पवार,वामन सोळंकी,सचिन सासणे,सतीश मदने, इन्ताब इनामदार,भास्करराव डिगोळे,आदि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.