जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणाची प्रारुप प्रभाग रचना जाहीर

आटपाडी तालुक्यात ४ ऐवजी ५ जि.प.गट व ८ ऐवजी १० पं.स.गण
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी

आटपाडी तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गणाची प्रारुप प्रभाग रचना मसुदा जाहीर करण्यात आला असून नव्याने एका गटाची निर्मिती होऊन पाच जिल्हा परिषद गट व दहा पंचायत समिती गण निर्माण करण्यात आले आहेत.
आटपाडी पंचायत समितीमध्ये निर्वाचन गणाची संख्या व त्याची व्याप्ती निश्चित करताना निर्वाचन गण असणाऱ्या आदेशाचा प्रारूप मसुदा प्रसिद्ध करण्यात आला आहे. या आदेशाच्या मसुद्यास ज्या लोकांच्या हरकती असतील त्यांनी सकारण हरकती जिल्हाधिकारी सांगली यांच्याकडे ८ जूनपर्यंत सादर करण्यात याव्यात असे सूचित केले आहे.
दिघंची जिल्हा परिषद गटामध्ये दिघंची निर्वाचन गण व विठलापूर निर्वाचन गण असे दोन गण असून विठलापूर गणांमध्ये राजेवाडी,लिंगीवरे, पळसखेल, आवळाई,गळवेवाडी, विठलापूर या ग्रामपंचायतींचा व शेरेवाडी, पिसेवाडी या गावांचा समावेश आहे.
दिघंची पंचायत समिती गणामध्ये दिघंची, पुजारवाडी(दि),उंबरगाव या ग्रामपंचायतीचा तसेच पांढरेवाडी(दि) गावाचा समावेश आहे.
आटपाडी जिल्हा परिषद गटांमध्ये कौठुळी व आटपाडी या दोन गणांचा समावेश असून कौठुळी गणामध्ये मापटेमळा, कौठुळी,देशमुखवाडी, आटपाडी (बुथ क्रमांक १०४ ते ११०) याचा समावेश आहे, तर आटपाडी पंचायत समिती गणामध्ये आटपाडी (बूथ क्रमांक ७५ ते १०३) व भिंगेवाडीचा समावेश आहे.
करगणी जिल्हा परिषद गटामध्ये माडगुळे व करगणी असे दोन पंचायत समिती गण असून माडगुळे गणामध्ये पिंपरी खुर्द,आंबेवाडी, बोंबेवाडी, खानजोडवाडी,यपावाडी, पुजारवाडी(आ.), मासाळवाडी, माडगुळे, लेंगरेवाडी,तडवळे या गावांचा समावेश आहे.करगणी पंचायत समिती गणामध्ये करगणी, शेटफळे, माळेवाडी, मात्रेवाडी या गावाचा समावेश आहे.
निंबवडे जिल्हा परिषद गटामध्ये निंबवडे व घरनिकी या दोन पंचायत समिती गणांचा समावेश आहे. निंबवडे पंचायत समिती गणामध्ये निंबवडे, मुढेवाडी, वाक्षेवाडी, कामथ, मिटकी, बाळेवाडी, बनपुरी या गावांचा तर घरनिकी पंचायत समिती गणामध्ये विभुतवाडी,गुळेवाडी, कुरुंदवाडी, झरे, पिंपरी बुद्रुक, पारेकरवाडी,पडळकरवाडी,जांभुळणी,घरनिकी या गावांचा समावेश आहे.
खरसुंडी जिल्हा परिषद गटामध्ये खरसुंडी व नेलकरंजी या दोन गणांचा समावेश असून खरसुंडी पंचायत समिती गणामध्ये घाणंद, वलवण, चिंचाळे, खरसुंडी, धावडवाडी, आवटेवाडी, कानकात्रेवाडी या गावांचा समावेश आहे. नेलकरंजी पंचायत समिती गणामध्ये नेलकरंजी, गोमेवाडी, मानेवाडी, तळेवाडी, काळेवाडी, हिवतड या गावांचा समावेश आहे.
हा प्रारुप आराखडा,मसुदा आज प्रसिद्ध करण्यात आला असून या आदेशाच्या मसुद्यास ज्या लोकांच्या काही हरकती असतील, त्यांनी त्या हरकती सकारण जिल्हाधिकारी, सांगली यांच्याकडे दिनांक ८ जून २०२२ किंवा तत्पूर्वी लेखी स्वरुपात सादर कराव्यात, असे सूचित करण्यात आले आहे.