प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
कवठेमहांकाळ
संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या कवठेमंहाकाळ विकास सोसायटीच्या निवडणुकीमध्ये माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे,आमदार सुमनताई पाटील,अनिताताई सगरे यांच्या नेतृत्वाखालील महाकाली शेतकरी विकास पॅनलने आठच्या आठ जागेवर एकतर्फी विजय मिळवला. या विजयानंतर माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतिषबाजी करत विजयी रॅली काढली व जल्लोष केला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, कवठेमंहाकाळ विकास सोसायटीची निवडणूक ही अपक्ष उमेदवारांनी चर्चेची केली होती. परंतु अजितराव घोरपडे यांचे नेतृत्व आणि माजी चेअरमन दिलीप झुरे यांचे काम यामुळे कवठेमंहाकाळ विकास सोसायटीवर महांकाली शेतकरी विकास पॅनलचा झेंडा फडकला.
एकूण १३ जागांपैकी पाच जागा या बिनविरोध झाल्या होत्या, तर आठ जागांसाठी निवडणूक लागली होती. माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे, आमदार सुमनताई पाटील, सुरेशभाऊ पाटील आणि अनिताताई सगरे,शांतनु सगरे या सर्वांनी एकत्रित येत महांकाली शेतकरी विकास पॅनल आठ जागांसाठी निवडणूक रिंगणात उतरवले होते.
त्याच्या विरोधात अपक्षांनी मोट बांधत शेतकरी विकास पॅनलचे आठ उमेदवार रिंगणात उभे केले होते .
मतमोजणी व मतदान प्रक्रिया पार पडली. यामध्ये महाकाली शेतकरी विकास पॅनलचे आठच्या आठ उमेदवार निवडून आले.
या १३ पैकी आठ उमेदवार हे माजी मंत्री घोरपडे यांचे आहेत. तर आर.आर.पाटील गटाचे चार उमेदवार असून एक सगरे गटाचा उमेदवार आहे.
या कवठेमंहाकाळ विकास सोसायटीसाठी १२२२ मतदान झाले.त्यापैकी माजी चेअरमन दिलीप देशमुख यांनी १०३१ एवढी विक्रमी मते घेतली. तर दुसऱ्या नंबरवर तुकाराम संभाजी पाटील यांनी ९५० मते घेतली तर दुसऱ्या नंबर वरती तुकाराम आबा पाटील यांनी ९०५ मते घेतली. या तिन्ही उमेदवारांचे मताधिक्य पाचशे ते सहाशेच्या घरात आहे.
एकूणच कवठेमंहाकाळ विकास सोसायटीवर माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांनी आठ जागा आपल्या गटाकडे खेचत पुन्हा एकदा निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे,तर आमदार गटालाही चार जागा मिळाल्या आहेत आणि सगरे गटाला एक जागा मिळाली आहे.
विजयी उमेदवार असे- दिलीप देशमुख(1031) ,तुकाराम संभाजी पाटील(950),तुकाराम आबा पाटील(905),निखिल घाडगे(799),अशोक पाटील (665),बाळासाहेब पाटील( 799 ),बंडू सूर्यवंशी( 734),दिनकर जाधव(866)
बिनविरोध उमेदवार असे- सुनील माळी,सुलोचना माळी,प्रकाश माने,काका बंडगर,पुष्पा पाटील

संबंधित बातम्या
घाणंद ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रविण कदम बिनविरोध
अजनाळे ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता
आटपाडी येथे भाजपाच्या वतीने महाविकास आघाडीचा पुतळा दहन करून आंदोलन