प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
जत
कोंतेवबोबलाद (ता. जत) येथील सर्व सेवा विकास सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध करण्यात आली. माजी आमदार विलासराव जगताप यांच्या प्रयत्नाला यश आले आहे.
गुरुवार, दि. २६ मे रोजी पाच उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे १३ जागांसाठी १३ अर्जच शिल्लक राहिल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी व गावात शांतता नांदावी यासाठी माजी आमदार विलासराव जगताप यांच्या प्रयत्नामुळे कोंतेवबोबलाद विकास सोसायटीची निवडणूक बिनविरोध करण्यात आली.
कोंतेवबोबलाद, कोनबगी,गुलगुंजनाळ, करेवाडी, मोटेवाडी अशा पाच गावांचे विकास सोसायटीचे कार्यक्षेत्र आहे. बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये शंकर सावंत, रमेश जगताप, लक्ष्मण सबकाळे, दादू भिसे, रजाकसाब ‘पाटील (पटेल), शिवानंद गडदे, तुकाराम जगताप, हरिबा जाधव, कोंतेव्वा बिरादार, तंगव्वा कोळेकर, लक्ष्मण माळी, भाऊसाहेब वाघमारे, जालिंदर व्हनमाने यांचा समावेश आहे. संस्था बिनविरोध झाल्यानंतर नुतन संचालक मंडळाचा मान्यवरांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.

संबंधित बातम्या
घाणंद ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रविण कदम बिनविरोध
अजनाळे ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता
आटपाडी येथे भाजपाच्या वतीने महाविकास आघाडीचा पुतळा दहन करून आंदोलन