आटपाडी येथील श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क / आटपाडी:
आटपाडी येथील श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात पार पडला. महाविद्यालयात २०११-१२ मध्ये वाणिज्य शाखेत असलेल्या विद्यार्थी – विद्यार्थिनी १० वर्षांनंतर एकमेकांना भेटले. या भेटीच्या आनंदासोबत आठवणींच्या दुनियेत रममान होताना डोळ्यांतून डोकावणारे अश्रूही अनेकांना थोपविता आले नाही. एकमेकांशी हितगूज करताना शालेय जीवनातील आठवणींची पाने परस्परांच्या साथीने उलगडू लागली. तसतसे भूतकाळात शिरताना आणि वर्तमानाची त्याच्याशी सांगड घालताना सर्वांनाच अनोख्या दुनियेची सफर घडली आणि माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यातील सुखानुभूतीचा प्रत्यय रोमांचित करून गेला.
श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालय आटपाडीचे प्राचार्य डॉ.विजय लोंढे तसेच वाणिज्य शाखेचे प्राध्यापक डॉ.किशोर जाधव,डॉ.सौ.ऋतुजा कुलकर्णी व महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
आपल्या शालेय जीवनातील जुन्या आठवणींमध्ये रमले. एकमेकांशी त्यांनी संवाद साधून शालेय जीवनातील विविध प्रसंगांना उजाळा दिला. उत्तम असे नेतृत्व पार पाडत विकास गायकवाड यांनी सर्व विध्यार्थी-विध्यार्थिनी व शिक्षकाना एकत्र आणले.
तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरी देशमुख व प्रास्ताविक विकास गायकवाड यांनी केले. अनिल गायकवाड, समाधान जाधव, सोमनाथ भंडारे, संदीप बाबर, सुरज देशमुख, संतोष देशमुख, सुनील पाटील, सायली नेवासकर, अश्विनी कुलकर्णी, शिल्पा लाळे व बऱ्याच विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रम संपल्यानंतर हास्य खेळाचा सर्वांनी आनंद घेतला व जेवणाचाही आस्वाद घेतला.

संबंधित बातम्या
भारती विद्यापीठ इंग्लिश मेडीयम स्कुल लोहेगाव पुणे येथे सीबीएसइ चे सीओइ प्रशिक्षणाचे यशस्वी आयोजन
जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात गुरूकुल विद्यालयाचे सुयश
लिंगीवरे येथील धुळाजीराव झिंबल विद्यालयाचे विज्ञान प्रदर्शनात यश