बनपुरीत मुख्याध्यापक शंकर बंडगर यांचा माजी विद्यार्थ्यांनी सेवानिवृत्तीनिमित्त केला सत्कार !

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी

बनपुरी-तडवळे येथील श्रीमंत बाबासाहेब देशमुख हायस्कूलचे मुख्याध्यापक व गणित विषयाचे शिक्षक शंकर नामदेव बंडगर यांचा बनपुरी येथे माजी विद्यार्थ्यांच्या वतीने सपत्नीक सत्कार करण्यात आला.
सत्कारमूर्ती शंकर बंडगर म्हणाले,मातीतील माणसांनी केलेला सत्कार महत्वाचा आहे.रोजगार करून शिक्षण पूर्ण केले.संघर्षातून उभा राहिलो.विद्यार्थीप्रिय शिक्षक व्हायचं,विद्यार्थ्यासाठी काम करायचं ठरवलं.आज विद्यार्थी इंजिनिअर,डॉक्टर, शिक्षक झाले असतील पण ते विद्यार्थी मार्गी लागले, याचा आनंद झाले.पहिल्यापासून विद्यार्थी हित पाहिले.कधीही वाईट घडणार नाही,याची दक्षता घेतली.
सांगली जिल्हा मंजूर फेडरेशनचे उपाध्यक्ष महादेवराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष दत्तात्रय यमगर,सुनिल बारवकर,हैबतराव ठेंगले,जयवंत बंडगर, पुणे पदवीधर शिक्षक मतदारसंघाचेे नेते दिलीप कचरे,ग्रामपंचायत सदस्य बी.एन.बंडगर, सामाजिक कार्यकर्ते व सेवानिवृत्त ग्रंथपाल गोविंद काळे यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले.शिवाजीराव खताळ यांनी आभार मानले.हैबतराव पावणे यांनी सूत्रसंचालन केले.भाऊसाहेब ढवळे,कलाशिक्षक बी.आर.साळुंखे आदि मान्यवर उपस्थित होते.