नंदकुमार विभुते
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
माडगुळे
माडगुळे येथील ग.दि.माडगूळकर हायस्कूल व पद्म. वसंतदादा पाटील ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य अशोक गणपत पाटील यांचा सेवानिवृत्ती सेवागौरव समारंभ संपन्न झाला.
मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक चेअरमन प्रा.टी.ए.चव्हाण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
कोल्हापूर अप्पर जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी शंकरराव जाधव, सांगली जिल्हा क्रीडा अधिकारी माणिकराव वाघमारे, कामगार नेते हरिदास लेंगरे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते.
सावित्री उद्योग समूहाचे संस्थापक भारततात्या पाटील, मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे मुख्य विश्वस्त अजित चव्हाण, अध्यक्ष डॉ.एम.व्ही.जाधव, माणगंगा उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष आनंदरावबापू पाटील, विद्यालयाचे माजी प्राचार्य जे.आर.चव्हाण, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष एन.बी.विभुते, माडगुळेच्या सरपंच सौ.संगीता गवळी,यपावाडीच्या सरपंच सौ.सुवर्णा चव्हाण,खानजोडवाडीचे सरपंच रामदास सुर्यवंशी, मासाळवाडीचे सरपंच सौ.सखुबाई तळे, लेंगरेवाडीच्या सरपंच सौ.वंदना लेंगरे, सांगली जिल्हा क्रीडा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष जनार्धन झेंडे,आदि मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कोल्हापूरचे जिल्हा दंडाधिकारी शंकरराव जाधव म्हणाले, ज्यांनी जे क्षेत्र निवडले, त्या क्षेत्रामध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न केला. आयुष्यात आपल्या जे वाट्याला येते, ते चांगल्या पद्धतीने, प्रामाणिकपणे सेवा करून सत्कारणी लावायचे आणि त्याचाच खरा आनंद घ्यायचा, तेच खरे यशस्वी आयुष्य ! तुम्ही काय जगता, कुणाच्या विचाराने जगता, कुणाच्या संस्काराने वाढला, त्याचा खूप मोठा परिणाम चेहऱ्यावर दिसतो.प्रशासनामध्ये काम करताना मला लहानपणीचे धाडस उपयोगाला आले. सेवानिवृत्तीनंतर अव्याहतपणे काम करा, आयुष्यात जे करता आले नाही, तो व्यासंग जपा.
मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक चेअरमन प्रा.टी.ए.चव्हाण म्हणाले, विरंगुळा म्हणून एक.जी.पाटील यांनी क्रीडा क्षेत्रात योगदान द्यावे. त्यांनी मन, मेंदू, मनगट याचे सामर्थ जपले.
यावेळी बोलताना सांगली जिल्हा क्रीडा अधिकारी माणिकराव वाघमारे म्हणाले, जिल्हा क्रीडा कार्यालयात पाटील सरांना आदराने वागणूक दिली जात होती. त्यांचा आदरयुक्त दबदबा होता. त्यांचा कामाचा ठसा उल्लेखनीय आहे.जिल्हा व तालुकास्तरावर चांगली क्रीडा परंपरा रुढ करण्यासाठी प्रयत्न करावेत. यावेळी पुढे बोलताना वाघमारे यांनी क्रीडा विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली.
यावेळी बोलताना कामगार नेते हरिदास लेंगरे म्हणाले,राग असणे योग्य आहे, पण तो कोणत्या ठिकाणी वापरणे हे महत्त्वाचे आहे.तो योग्य ठिकाणी वापरला पाहिजे. राग परिवर्तन करण्यासाठी, परिस्थिती बदलण्यासाठी वापरला पाहिजे. या शाळेने जगायला शिकवले, संघर्ष करायला शिकविले. गरीबी हा आजार आहे. जिद्द,चिकाटी व प्रामाणिकपणा हे त्याच्यावर औषध आहे. योग्यवेळी योग्य सल्ला मिळाल्यानंतर माणूस चांगली प्रगती करू शकतो.
माणगंगा उद्योग समूहाचे अध्यक्ष आनंदराव (बापू) पाटील म्हणाले, खाजगीकरणाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण बदलले पाहिजे. उद्योजकतेकडे तरुणांनी वाटचाल केली पाहिजे.
मॉडर्न एज्युकेशन सोसायटी व विद्यालयाच्या वतीने त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.यावेळी सेवानिवृत्तीनिमित्त घाणंद हायस्कूलचे मुख्याध्यापक डी.व्ही.नांगरे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
माजी प्राचार्य जे.आर.चव्हाण,वाय.डी.चव्हाण,सौ.प्रियांका माने-पाटील, विद्यार्थिनी सृष्टी सतीश चव्हाण, मेघराज हरिदास लेंगरे, यांनी मनोगत व्यक्त केले.सुरेश गायकवाड यांनी प्रास्ताविक केले.किशोर चांदणे यांनी सूत्रसंचालन केले. टी.एस.पाटील यांनी आभार मानले. विद्यालयातील विद्यार्थिनींनी स्वागतगीत गायले.


संबंधित बातम्या
भारती विद्यापीठ इंग्लिश मेडीयम स्कुल लोहेगाव पुणे येथे सीबीएसइ चे सीओइ प्रशिक्षणाचे यशस्वी आयोजन
जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात गुरूकुल विद्यालयाचे सुयश
लिंगीवरे येथील धुळाजीराव झिंबल विद्यालयाचे विज्ञान प्रदर्शनात यश