भाजप-काँग्रेसची अभद्र युती, मतदारांनो जोडा अपक्षांनी नाती !

हुकुमशाही विरुद्ध निर्भीडपणे मतदान करा- विक्रम ढोणे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
जत

बिळूर सेवा सोसायटीच्या निवडणुकीमध्ये सत्ताधारी भाजप आणि काँग्रेस यांची अभद्र युती झाली आहे .ही अभद्र युती होत असताना भाजप व काँग्रेसच्या नेत्याने कोणत्याही कार्यकर्त्यांला विश्वासात न घेतल्याने प्रचंड नाराज आहे.या युती विरोधात अपक्ष उमेदवार एकत्र येत निवडणुकीत रंगत आणली आहे. या अपक्ष उमेदवारांवर भाजपा व काँग्रेस मधील प्रस्थापित मंडळी प्रचार न करण्याचा दबाव आणत आहेत. तरी काही अपक्ष मंडळींनी युवा नेते विक्रम ढोणे व संजय कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रचार करून निवडणुकीला सामोरे जात आहेत.
यावेळी बोलताना विक्रम ढोणे म्हणाले की,बिळूर सोसायटीच्या कार्यक्षेत्रात खिलारवाडी,साळमळगेवाडी या गावांचाही समावेश आहे. सभासदांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता लोकशाहीतील आपला मतदानाचा हक्क निर्भीडपणे बजावा. सत्ताधारी मंडळींनी सोसायटीमार्फत चालवलेलं कृषी सेवा केंद्र तोट्यात दाखवून खाजगी व्यक्तींना हस्तांतरित करून तेच सेवा केंद्र आज फायद्यात कसे म्हणजेच ज्या सेवा केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा होणार होता.शेतकऱ्यांच्या हितापेक्षा व्यक्ती हिताला महत्त्व देऊन शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण करण्याचं काम केले आहे. सभासदाने मतदाररुपी आशीर्वाद द्यावा, अशी विनंती त्यांनी केली.