मांडवे गावच्या पोटनिवडणुकीत विरोधी पॅनल प्रमुखाकडून काढता पाय तर घेतला जात नाही ना? -रितेश पालवे

संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
माळशिरस

माळशिरस तालुक्यातील मांडवे गावची पोटनिवडणूक नुकतीच जाहीर झाली असून दोन्ही पार्टीकडून चांगलीच ताकत लावली जाताना दिसत आहेत. जयवंत पालवे यांच्या गटाकडून पुष्पा हनुमंत पालवे यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे. तर तानाजी पालवे यांच्या गटाकडून तिघांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी एक अर्ज बाद झाला आहे. तर शोभा नाथा सिद व धनश्री तानाजी पालवे यांचा उमेदवारी अर्ज राहिला आहेत. या दोन्ही अर्जांपैकी नक्की कोणता अर्ज मागे घेतला जाणार? यावर गावात चांगलीच चर्चा जोर धरत आहे. शोभा नाथा सिद यांचा उमेदवारी अर्ज ठेवला तर विरोधी गटाचे पॅनल प्रमुख या निवडणुकीतून पळ काढतात काय? आपल्या पत्नीचा अर्ज ठेवून संघर्षाची तयारी ठेवतात हे सध्या पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे, असे मत ग्रामपंचायत सदस्य रितेश पालवे यांनी व्यक्त केले
पुढे बोलताना ते म्हणाले की, गावामध्ये सध्या जयवंत पालवे गटाची सत्ता आहे. सत्ता अगदी काठावर आल्यामुळे दोन्ही गटाकडे सध्या आठ-आठ सदस्य आहेत. येणाऱ्या उमेदवारांवर बहुमत सिद्ध होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीला कमालीचं महत्त्व प्राप्त झाले आहे . तानाजी पालवे गटाचे उमेदवार विजयी झाले तर बहुमत तानाजी पालवेचे होईल. पण सरपंच मात्र जयवंत पालवे गटाचा कायम राहील. कारण सरपंच पदावर अविश्वास आणण्याइतपत तानाजी पालवे यांच्याकडे उमेदवारी संख्याबळ असणार का? आणि गावच्या सर्वांगीण विकासासाठी व ठरल्याप्रमाणे सरपंच निवडी करण्याकरिता जयवंत पालवे यांना ही निवडणुक जिंकावी लागणार आहे.त्यामुळे आता कोण कोणास भारी पडते ? हे निवडणुकीनंतरच ठरणार आहेे.
गतवर्षी गावामध्ये विकास पाहता ५० फाटा हा गेल्या वीस वर्षापासून विकासापासून वंचित होता. विरोधकांनी ५१ फाट्याचे कुस्ती मैदान केले होते व आता झालेला विकास पाहता जयवंत पालवे गटाला निवडणूक जिंकणे सोपे जाणार आहे. या कामामुळेच विरोधक पाहुण्यांचा निवडणुकीत बळी देत आहेत का? असा सवाल उपस्थित होतो.