प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी
बनपुरी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी विकास पुकळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
सुजाता संतोष ढवळे यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद रिकामे झाले होते.या जागी विद्यमान सदस्यातून विकास पुकळे यांची निवड करण्यात आली.यासाठी ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य आणि सरपंच व माजी उपसरपंच ढवळे यांचे सहकार्य लाभले.या निवडीसाठी हणमंत पाटील,दीपक देशमुख,घमाजी बुरुंगले,मच्छिंद्र पाटील,बिरु बंडगर,धनंजय कांबळे व सर्वसदस्य यांनी सहकार्य केले.
आमदार गोपीचंद पडळकर गटाचे कार्यकर्ते विकास पुकळे यांची उपसरपंच पदी निवड करून सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केल्याबद्दल ग्रामस्थांमधून समाधानाची भावना व्यक्त होत आहे.
निवडीनंतर विकास पुकळे यांचा ग्रामपंचायतीच्यावतीने सत्कार व अभिनंदन करण्यात आले.
निवडीवेळी सरपंच सौ.सुनिता महादेव पाटील,सौ.आंबूताई रावसाहेब बुरुंगले,सौ.छाया आप्पा ठेंगले, सौ.शालन मधुकर काळे,दिपक देशमुख,राजेंद्र यमगर हे सदस्य उपस्थित होते.
हणमंत पाटील,मच्छिंद्र पाटील,महादेव पाटील,शहाजी पुकळे,जालिंदर यमगर,हणमंत पुकळे,दिलीप पुकळे,विलास कचरे,नामदेव चौगुले,जयवंत पुकळे,शिवाजी पुकळे आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते.

संबंधित बातम्या
घाणंद ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रविण कदम बिनविरोध
अजनाळे ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता
आटपाडी येथे भाजपाच्या वतीने महाविकास आघाडीचा पुतळा दहन करून आंदोलन