सभासद हिताचा कारभार शिक्षक समितीच करू शकते : किरणराव गायकवाड

सोनारसिद्ध मंदीरात शिक्षक बँक निवडणुक प्रचारपूर्व समारंभ संपन्न
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी

सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीचा धुरळा आता उठला असून सलग दोनवेळा सभासदांनी विश्वास दाखविल्याने अनेक सभासद हिताचे निर्णय घेण्यात शिक्षक समितीचे पुरोगामी सेवामंडळ यशस्वी ठरले आहे. सभासद हिताचे सातत्य ठेवण्यासाठी सर्वांनी झपाटून कामाला लागावे, असे आवाहन आटपाडी येथील सोनारसिद्ध मंदीरात पार पडलेल्या निवडणुक प्रचारपूर्व समारंभात राज्याचे माजी कार्याध्यक्ष किरणराव गायकवाड यांनी केले.
शिक्षक समिती ही नेहमी शिक्षकांचे प्रश्न घेऊन रस्त्यावरची लढाई लढणारी व शिक्षकांना न्याय देणारी संघटना असून अनेक मोर्चे, आंदोलने ,संप करून शिक्षकांचे जीवनमान उंचावण्यासाठी सातत्याने शासन व प्रशासनाची दारे ठोठावणारी म्हणून ओळख निर्माण केलेली आहे.
सोलापूरचे शिक्षक समिती सरचिटणीस अमोगसिद्ध कोळी यांनी सांगलीकरांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी सोलापूरचे सभासद नक्कीच आघाडी घेतील अशी ग्वाही दिली. ज्यांनी आम्हास सभासद होण्यापासून व कर्ज वाटप होऊ न देण्यापर्यंत विरोध केला, त्यांनी नक्कीच सोलापूरचे सभासद योग्यवेळी धडा शिकवतील.
शिक्षक बँकेचे चेअरमन यु.टी.जाधव यांनी पुरोगामी सेवामंडळाने एक अंकी कर्जाचा व्याजदर, डिव्हीडंटमध्ये चढता आलेख, मासिक कायम ठेवी दोनवेळा परत करणे, स्टँप ड्युटीत कपात, ६ % वरून २.५% शेअर्स कपात, मासिक वर्गणी ५०० वरून १०० रु केली. मृत संजीवनी ठेव योजनेची प्रभावी अंमलबजावणी, सी टी एस बँकिंग , कर्मचारी आकृतीबंध कपात असे अनेक निर्णय घेतल्याने सभासद वर्गात समाधान असून दोनवेळा चेअरमनपदाचा विश्वास टाकल्याने नक्कीच आटपाडीकरांची जबाबदारी वाढल्याचे सांगून सभासद हिताच्या अनेक निर्णयांचे सभासदांनी स्वागत केले असून पुन्हा सभासद साथ देतील असा विश्वास व्यक्त केला.
सोलापूरचे शिक्षक नेते सुरेश पवार यांनी पुरोगामी सेवा मंडळाने सोलापूरच्या शिक्षक सभासदांना सभासद करून अर्थसहाय्य करून प्रगतीची दारे उघडल्याने व या गोष्टी घडत असताना विरोधकांनी केलेला तीव्र विरोध नक्कीच लक्षात ठेवून त्याचे उत्तर मतदानातूनच देतील. शिवाय शिक्षक बँकेने अनेक सभासदभिमुख योजना राज्य नेते विश्वनाथ मिरजकर अण्णा, व पार्लमेंटरी बोर्ड आणि संचालक मंडळाने राबविल्या आहेत असे प्रतिपादन केले.याचा फायदा शिक्षक समितीचे पुरोगामी सेवा मंडळ सत्तेत येण्यासाठी निश्चीतच होणार आहे.
स्वागत व प्रास्ताविक तालुकाध्यक्ष संजय कबीर यांनी करून आटपाडीसाठी दोन उमेदवारांची आग्रही मागणी केली. तसेच शिक्षक बँकेने अनेक प्रकारचे चांगले निर्णय सभासदाभिमुख घेतलेने एकाच पुष्पहारात सर्व मान्यवर यांचा सत्कार केला.
माजी अध्यक्ष शामराव ऐवळे व आदर्श शिक्षक हैबतराव पावणे यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी राज्यनेते विश्वनाथ (अण्णा ) मिरजकर, राज्यसंघटक सयाजीराव पाटील, पुणे विभागीय अध्यक्ष दयानंद कवडे, सोलापूर शिक्षक समिती जिल्हाध्यक्ष अनिल (बापू ) कादे , सांगली जिल्हाध्यक्ष माणिकराव पाटील, जिल्हा सरचिटणीस हरिभाऊ गावडे, पार्लमेंटरी बोर्डाचे अध्यक्ष किसनराव पाटील, सचिव शशिकांत भागवत, शिक्षक बँकेचे संचालक तुकाराम गायकवाड, शिवाजीराव पवार, रमेश पाटील, शशिकांत बजबळे, महादेव माळी, सुनिल गुरव, शिक्षक नेते दयानंद मोरे, आर.आर.सावंत, भागवत भाटेकर, हामजुभाई मुलाणी, बाजीराव सावंत, दिपक कोळी, युवराज कोळेकर, तालुकाध्यक्ष सुरेश नरुटे, तानाजी देशमुख, श्रीकांत शिंदे, रामराव मोहीते, सुरेश पाटील, बाळासाहेब बंडगर, राजाराम शिंदे, प्रदिप मोकाशी व आटपाडी तालुक्यातील प्रचंड संख्येने सभासद बांधव व भगिनी आणि पदाधिकारी उपस्थित होते.
सुत्रसंचालन आटपाडी शिक्षक समिती कार्याध्यक्ष विजयराव पवार यांनी केले. आभार सरचिटणीस नानासाहेब झुरे यांनी मानले. यावेळी कार्यक्रमात आजिनाथ आंधळे यांनी शिक्षक समिती या संघटनेच्या विचारधारेवर विश्वास व्यक्त करत  जाहीर प्रवेश केला.