जि.प.प्राथ.मराठी शाळा जत नं.३ मध्ये शाळापूर्व तयारी कार्यक्रम उत्साहात

अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:

शाळापूर्व तयारी पहिला मेळावा अनुषंगाने प्रभात फेरी व दवंडीचा कार्यक्रम पार पडला. यामध्ये जत नं.३ व जि प कन्नड शाळा जतचे सर्व शिक्षक, विद्यार्थी तसेच या दोन शाळांच्या अंतर्गत येणाऱ्या अंगणवाडी सेविका व मदतनीस सहभागी झाल्या होत्या.तसेच जत नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. शुभांगी बननेनवर यांनीही या प्रभातफेरीत सहभाग घेतला.
प्रभातफेरी सकाळी ८ वाजता काढण्यात आली.मंगळवारपेठ, पारधी गल्ली, उमराणी रोड, स्टील कॉलनी, शंकर कॉलनी या भागातून प्रभातफेरी व दवंडी देण्याचा उपक्रम संपन्न झाला.यामध्ये विविध मेळावे, गीतांचे गायनसुध्दा करण्यात आले.या उपक्रमास जतमधील नागरिक व पालक यांनी भरभरून प्रतिसाद दिला.