सहायक आयुक्त सौ.मेघा ढोले- खाडे यांनी केला संजय खरात यांचा सन्मान
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
दहिवडी
मुंबईच्या सेल टॅक्स सहायक आयुक्त सौ.मेघा ढोले खाडे तसेच तडवळे गावचे माजी सरपंच भास्कर खाडे यांनी दहिवडी येथे येऊन घरोघरी शाळा उपक्रमाचे प्रणेते संजय खरात यांना शाल, श्रीफळ व बुके देऊन त्यांचा विशेष सन्मान केला. तसेच या उपक्रमास आवश्यक असेल ती मदत देण्याचे आश्वासन दिले.
संजय खरात यांनी कोरोना काळात ‘घरोघरी शाळा’ या उपक्रमाद्वारे केलेल्या उल्लेखनीय शैक्षणिक कार्याची माहिती विविध वर्तमानपत्रे व न्यूज चॅनेलच्या माध्यमातून त्यांना समजली होती. संजय खरात यांनी प्रत्येक विद्यार्थ्याच्या घरी स्वतंत्र शाळा तयार करून विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू ठेवण्यासाठी राबविलेली ही अभिनव संकल्पना विशेष भावल्यामुळे सहाय्यक आयुक्तांनी संजय खरात यांच्या गावी दहिवडी येथे जाऊन त्यांचा विशेष सन्मान केला. त्यांनी केलेल्या कार्याची सविस्तर माहिती घेतली व त्यांना पुढील शैक्षणिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

संबंधित बातम्या
भारती विद्यापीठ इंग्लिश मेडीयम स्कुल लोहेगाव पुणे येथे सीबीएसइ चे सीओइ प्रशिक्षणाचे यशस्वी आयोजन
जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात गुरूकुल विद्यालयाचे सुयश
लिंगीवरे येथील धुळाजीराव झिंबल विद्यालयाचे विज्ञान प्रदर्शनात यश