
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /आटपाडी:
हिवतड विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी धर्मराज जयसिंह देशमुख (सर) तर व्हाईस चेअरमनपदी सौ.हेमलता नारायण धुरुपे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
स्वाभिमानी जनता विकास पॅनलने विकास सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये १३ पैकी ११ जागांवर विजय मिळवून आपली सत्ता प्रस्थापित केली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस.जे.चंदनशिवे व सचिव गिड्डे यांनी काम पाहिले.
भारतीय जनता पार्टीचे आटपाडी तालुका अध्यक्ष उमाजी सरगर, माजी चेअरमन दगडू जयसिंग देशमुख, सरपंच सौ. रुपालीताई सरगर, माजी चेअरमन शंकरराव खंडेकर, उपसरपंच वसंतराव माळी, माजी उपसरपंच अनिल घुटुगडे, माजी उपसरपंच शहाजी यमगर, दत्तात्रय काळे, अशोकराव खांडेकर, रामदादा देशमुख, मारुती डोंबाळे, विलास डोंबाळे, दत्तात्रय माळी, जगन्नाथ देशमुख, युवराज पाटील, मारुती देशमुख, सागर देशमुख, दत्तात्रय देशमुख, बाळासाहेब लवटे, संपतराव खरात, समाधान जावीर, विलास देशमुख, रावसाहेब देशमुख व नूतन संचालक दत्तात्रय बाबासाहेब काटकर, राजाराम बापू अनुसे, संतोष रामचंद्र देशमुख, पोपट आकाराम सरगर, चंद्राबाई जगन्नाथ खरात,हणमंत बाबा माळी, तुकाराम आनंदा जावीर, आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
चेअरमन व व्हाईस चेअरमन निवडीनंतर गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
नूतन चेअरमन धर्मराज देशमुख यांनी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये लांजा तालुक्यातील भांबेड येथील प्रतापराव माने विद्यालय येथे अकरा वर्षे, शेटफळे येथील पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयात दहा वर्षे, गोमेवाडी येथील श्री गजानन हायस्कूल येथे दोन वर्षे व नेलकरंजी येथील छत्रपती शिवाजी हायस्कूल येथे दहा वर्षे असे एकूण ३३ वर्षे माध्यमिक शिक्षक म्हणून ज्ञानदानाचे पवित्र काम केले आहे.यामध्ये त्यांनी गणित, विज्ञान त्याचबरोबर माहिती संप्रेषण तंत्रज्ञान यासारखे महत्त्वपूर्ण विषय आपल्या वेगळ्या हातोडीने शिकवून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले आहेत. तसेच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडे त्यांनी परीक्षक, नियामक म्हणून यशस्वीरित्या कामकाज केले आहे. त्याचबरोबर सांगली जिल्ह्याचे नेतृत्वही केले आहे.
शैक्षणिक सेवेतून सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी शेतीकडे विशेष लक्ष देऊन डाळिंब, ऊस या पिकांमध्ये उत्पन्न काढीत असताना नवनवीन प्रयोग केले आहेत. शैक्षणिक व कृषी क्षेत्राबरोबरच त्यांनी अलीकडील काळात राजकीय क्षेत्रातही सक्रिय होऊन आपला विशेष ठसा उमटविला आहे. याची परिणिती म्हणून हिवतड विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये पॅनलला १३ पैकी ११असे बहुमत मिळवून पुढे त्यांना सोसायटीच्या नेतृत्वाची धुरा सांभाळण्याची जबाबदारी मिळाली आहे. त्यांच्या आतापर्यंतच्या सामाजिक कार्याच्या अनुभवाचा सोसायटीच्या माध्यमातून गावच्या विकासासाठी मोठा हातभार लागणार आहे.


संबंधित बातम्या
घाणंद ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रविण कदम बिनविरोध
अजनाळे ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता
आटपाडी येथे भाजपाच्या वतीने महाविकास आघाडीचा पुतळा दहन करून आंदोलन