जिल्हाधिकारी यांनी योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन
अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ जत :
जत नगरपरिषदेच्या अनागोंदी कारभाराविरोधात प्रभाग क्रमांक एकमधील लोकशाहीर आण्णा भाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेतील चौकशी करण्यासाठी नगरसेविका वनिता साळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण चालू केले होते. या आंदोलनास माजी नगरसेवक परशुराम मोरे, विक्रम ढोणे, कुमार साळे,चेअरमन किरण शिंदे,अरूण साळे,पांडुरंग सुर्यवंशी,संदीप जाधव,प्रसाद शिंदे,रतन मोरे,विशाल पाथारुट,राहुल शिंदे ,अभिनंदन साबळे,महेश चव्हाण आदींनी पाठिंबा दिला.
दुसऱ्या दिवशी जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांच्या दालनात यासंबंधी बैठक झाली. 5% जादा दराने निविदा मंजूर करून संगनमताने शासनाची फसवणूक केली जात असल्याचे तसेच 5% जादा दराने निविदा असूनही कामे निकृष्ट दर्जाची करत असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी तातडीने अहवाल मागून घेऊन योग्य ती कारवाई केली जाईल,असे आश्वासन दिल्यानंतर नगरसेविका वनिता साळे यांचे उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले. अहवालानंतर योग्य कार्यवाही न झाल्यास पुन्हा आंदोलन करण्यात येईल असेही साळे यांनी सांगितले.

संबंधित बातम्या
घाणंद ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रविण कदम बिनविरोध
अजनाळे ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता
आटपाडी येथे भाजपाच्या वतीने महाविकास आघाडीचा पुतळा दहन करून आंदोलन