दिघंची येथील ‘पद्मिनी फार्मसी’चे प्रा.दत्तात्रय मोटे यांच्या संशोधनास पेटंट

कविता यादव
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/दिघंची :

दिघंची येथील इंद्रभाग्य कृषी व ग्रामीण विकास संस्थेच्या पद्मिनी कॉलेज ऑफ फार्मसी या महाविद्यालयातील प्राध्यापक दत्तात्रय मोटे यांच्या ‘हर्बल मेडिकेशन इक्विपड मास्क’ या संशोधनास पेटंट म्हणून मान्यता मिळाली आहे. त्याबद्दल त्यांचा महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
पद्मिनी कॉलेज ऑफ फार्मसी या महाविद्यालयात फार्मसी अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांच्या व प्राध्यापकांच्या वैयक्तिक विकासाबरोबरच त्यांच्या संशोधन गुणांना वाव देण्यासाठी विविध संशोधन उपक्रम आयोजित केले जातात.
औषध निर्माण क्षेत्रातील शास्त्रज्ञ व नामवंत व्यक्तींचे सेमिनार, कॉन्फरन्स, गेस्ट लेक्चर, वर्कशॉप, वेबिनार, एफ.डी.पी. यासारखे विविध उपक्रम महाविद्यालयात घेतले जातात. विद्यार्थ्यांना व प्राध्यापकांना संशोधनासाठी याची भरपूर मदत होते.
प्रा.दत्तात्रय मोटे यांच्या या संशोधनास पेटंट म्हणून मान्यता मिळाल्याबद्दल संस्थेचे संस्थापक ईश्वरतात्या मोरे-पाटील, इंद्रभाग्य संकुलाच्या प्राचार्या सौ. स्वातीताई मोरे-पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य पानसकर यांनी प्रा. मोटे यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.