
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी:
शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूरच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक अभय जायभाये यांनी आटपाडी येथील कला व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागास सदिच्छा भेट दिली. यावेळी सरदार माने महाविद्यालय रहमतपुर येथील राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.शिवाजी चव्हाण व श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालय आटपाडीच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. धनंजय लोहार उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.नागेश चंदनशिवे व प्रा.भारती देशमुखे यांनी सर्वांचे स्वागत केले.
संचालक प्रा.अभय जायभाये यांनी सर्वांच्या समवेत राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यालयास भेट देऊन पाहणी केली व सर्व दप्तर तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यालय सुसज्ज असल्याचे कौतुक केले.


संबंधित बातम्या
भारती विद्यापीठ इंग्लिश मेडीयम स्कुल लोहेगाव पुणे येथे सीबीएसइ चे सीओइ प्रशिक्षणाचे यशस्वी आयोजन
जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात गुरूकुल विद्यालयाचे सुयश
लिंगीवरे येथील धुळाजीराव झिंबल विद्यालयाचे विज्ञान प्रदर्शनात यश