गोरडवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी विजय गोरड यांची बिनविरोध निवड

संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस :

माळशिरस तालुक्यातील गोरडवाडी, पश्चिम भागातील प्रतिष्ठित व निवडणुकीची रंगत असणारी ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते. गावातील नेतेमंडळी व तरुण कार्यकर्ते यांनी एकत्र येऊन ग्रामपंचायत बिनविरोध केली होती. विष्णू नाना गोरड यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिल्याने या पदासाठी निवडणुक लागली. यात निवृृत्ती गोरड यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे सरपंच म्हणून त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून निवडणूक निरिक्षक एस. टी . चव्हाण, सहकारी म्हणुन तलाठी दिग्विजय शहा, ग्रामविकास अधिकारी रविंद्र पवार यांनी काम पाहिले.
निवडणुकीसाठी ५ एप्रिल २०२२ रोजी अर्ज भरण्याची वेळ १०ते १२ ह्या वेळेत फक्त विजय निवृत्ती गोरड यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे त्यांची दुपारी २ वाजता बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीनंतर ग्रामस्थांनी जल्लोश केला .
सरपंचपदी विजय निवृत्ती गोरड यांची निवड झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण केली. सर्व उमेदवार व कार्यकर्ते यांना फेटे बांधून नूतन सरपंच व सदस्य यांना घोड्यावर बसवून, रथामध्ये विजय गोरड यांच्या मातोश्रींसह गावातील वृद्ध महिलांना बसवून गावातील ग्रामदैवत यांच्या दर्शनासाठी रवाना झाले.गोरडवाडी परिसर हलग्यांचा निनाद आणि फटाक्यांच्या आतषबाजीने दणाणून गेलेला आहे.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य विष्णू गोरड, उपसरपंच ताई यमगर, पांडुरंग पिसे, बायडाबाई गोरड, मेगाराणी कर्णवर , जयश्री कोकरे , ज्योती केंगार , मुगाबाई गोरड , पुनम गोरड , नानासाहेब हुलगे , भिकाजी गोरड , लक्ष्मण गोरड , हनुमंत गोरड ,रामचंद्र गोरड , यशवंत गोरड ,बाळासाहेब गोरड , अजिनाथ कर्णवर , दादा यमगर , महादेव यमगर , रामदास यमगर , जयवंत गोरड , गोदबा गोरड , सुग्रीव गोरड , धुळा गोरड , सुरेश यमगर , विजय यमगर , नाना यमगर , कांतीलाल लवटे , बापु कोकरे , महेश यमगर , आप्पा गोरड ,दयानंद यमगर , गणेश कोकरे , संजय कोळेकर सचिन हुलगे ,गणेश हुलगे ,माऊली सूर्यवंशी ,नवनाथ केंगार ,उत्तम गोरड ,सह ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.