दिघंची येथे जि.प.शाळा नं.१ मॉडेल स्कूलची पायाभरणी

पायाभरणी शैक्षणिक भविष्याची….
आरंभ शैक्षणिक प्रगतीचा…

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/दिघंची :
दिघंची येथे जि.प.शाळा नं.१ मॉडेल स्कूलचा पायाभरणी शुभारंभ आमदार गोपीचंद पडळकर व माजी सभापती हर्षवर्धन देशमुख यांच्या हस्ते संपन्न झाला.
यावेळी भाजपा नेते जयवंतभाऊ सरगर, जेष्ठ नेते भगवानराव मोरे, माजी उपसभापती बळवंतराव मोरे, जि. प.सदस्य मोहन रणदिवे, माजी उपसभापती रुपेश पाटील, पं.स.सदस्य उषाताई कलाप्पा कुटे, माजी सरपंच बाळासाहेब मोरे, भाजप युवा तालुकाध्यक्ष प्रणव गुरव, माजी ग्रा.पं. सदस्य सावंता पुसावळे, माजी ग्रा.पं. सदस्य दशरथ मोरे, भाजप नेते मोहनभाऊ मोरे, मार्केट कमिटी संचालक नानासाहेब मेनकुदळे, ग्रा.पं. सदस्य केशवराव मिसाळ, जयेंद्र मोरे पाटील, अविनाश रणदिवे, शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष सोपान काळे, अजित मोरे, चंद्रकांत पुसावळे, माजी ग्रा.पं. सदस्य आप्पासाहेब गोंजारी, दाऊदभाई तांबोळी, दिघंची भाजप युवा शहर अध्यक्ष अमोल सावंत, अपंग सेलचे अध्यक्ष प्रशांत चोथे, ओबीसी जिल्हा सरचिटणीस पिंटू भाळवनकर, दत्तात्रय पांढरे, उमाकांत कडव,अशोक पवार, सद्दाम झारी, गटशिक्षणाधिकारी दत्तात्रय मोरे, मुख्याध्यापक व सर्व शिक्षक स्टाफ,आदि उपस्थित होते.
यावेळी बोलताना ‌ आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले, सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी् यांचं काम चांगल्याप्रकारे आहे. आटपाडी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांना निधी कमी पडू देणार नाही.
आटपाडी पंचायत समितीच्या सभापती सौ. पुष्पाताई जयवंतभाऊ सरगर यांनी लक्ष देऊन आटपाडी तालुक्यातील सतरा शाळांचा मॉडेल स्कूलमध्ये समावेश केला. स्वतः लक्ष घालून मॉडेल स्कूलच्या कामाची पाहणी करून सर्व शाळांना भरघोस निधी देण्याचा प्रयत्न केला. जिल्हा परिषद शाळेची यावर्षी पटसंख्या वाढली आहे, ही बाब उल्लेखनीय आहे, असे ते म्हणाले.