अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ जत :
जत तालुक्यातील बिरोबा सहकिरी पतसंस्थेच्या चेअरमनपदी शिवाजी बंडगर तर व्हाईस चेअरमनपदी भारत माळी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
जत तालुक्यातील जुनी पतसंस्था अशी ओळख असणारी बिरोबा पतसंस्था १९९० साली सुरू करण्यात आली. संस्थेची आर्थिक उलाढाल अडीच कोटी रुपयांची असून संस्थेचे दोन हजार सभासद आहेत. या पंचवार्षिक (२०२२-२७ )ची निवडणूक संस्थेच्या परंपरेप्रमाणे बिनविरोध घेण्यात आली. सर्वानुमते संस्थेचे चेअरमन शिवाजी बंडगर व व्हाईस चेअरमन भारत माळी यांची निवड करण्यात आली.
संस्थेचे माजी चेअरमन वसंत मासाळ यांनी नूतन चेअरमन यांचा व बाबासाहेब पांढरे यांनी व्हा.चेअरमन यांचा सत्कार केला. संस्थेचे मार्गदर्शक अविनाश माने यांनी मनोगत व्यक्त केले. तर आभार सलगर सर यांनी मानले
यावेळी संस्थेचे संचालक अमित (बंटी) बाबुराव दुधाळ,राजू माने, राजू हैद्राबादे, राजू गुरव, महेश मासाळ ,वडतीले,सलगर, सौ.माने मॅडम,सौ.मुल्ला व संस्थेचे सचिव शिराज मुल्ला, क्लार्क सनदी, पाटील उपस्थित होते.

संबंधित बातम्या
घाणंद ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रविण कदम बिनविरोध
अजनाळे ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता
आटपाडी येथे भाजपाच्या वतीने महाविकास आघाडीचा पुतळा दहन करून आंदोलन