केजरीवाल नावाचे ‘भूत’ हे देखील संविधान विरोधी नाही का?
भाई शिवराम मासाळ
अध्यक्ष,बळीराजा फौंडेशन
देशातील आरक्षणाच्या विरोधात सगळ्यात ‘मोठं’ आंदोलन करणारे अरविंद केजरीवाल हेच व्यक्ती आहेत. युथ फॉर इक्वॅलिटी नावाची यांची संघटना होती. इंडिया अगेन्स्ट रिझर्व्हेशन संघटनेचे हे सदस्य आहेत. यांच्या इंडिया अगेन्स्ट करप्शन आंदोलनावेळी क्रांतिकारी मनुवादी मोर्चा ह्या संघटनेने बाबासाहेबांनी दिलेलं आरक्षण हेच देशाच्या अधोगतीचं मुख्य कारण आहे, हे जाहीर केलेलं. त्यावेळी अरविंद केजरीवाल यांनी तोंड बंद कसं काय ठेवलं?
फक्त बाबासाहेबांचा फोटो सरकारी कार्यालयात लावून भांडवल करतात, म्हणून मोठं करायची गरज नाही. देशात भाजपची सत्ता यायला अण्णा हजारेचं आंदोलनपण कारणीभूत आहे. त्या आंदोलनातले हे पण एक मोठे खेळाडू होते,हे विसरून चालणार नाही.
मोदी पण बाबासाहेबांच्या समोर हात जोडतात. पण इथं त्यांची धर्मांध विचारसरणी पुढे येते आणि राजकीय पोळी भाजण्यासाठी धर्मांध बोलायचे, राम मंदीराचे भांडवल करायचे, आणि धर्मांध चेहरा समोर ठेऊन देशातील हिंदूंना एकत्रित करून निवडणूका जिंकायच्या आणि पुन्हा परदेशात जाऊन बुद्धाच्या भारतातून आलोय असे सांगून जगात आपला ठसा उमटावायचा आणि तो उठवला देखील आहे. याचे उदाहरण युक्रेन-रशिया सूरु असलेले युद्ध आहे.
भारताला मध्यस्तीसाठी निमंत्रण हे काही पहिल्यांदाच आहे असे नाही. माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यूनोच्या अध्यक्षा होत्या,तेव्हादेखील यशस्वी मध्यस्थी केली आहे. माजी प्रधानमंत्री राजीव गांधी देखील श्रीलंकेला शांतीदूत म्हणून गेले.त्याचेच परिणाम तामीळ टायगर यांनी डोक्यात राग धरून हत्या केली होती, हे दूर्लक्षित करून चालणार नाही.
काल परवा उत्तरप्रदेशासह इतर तीन राज्यांच्या निवडणूकांचे निकाल आले. ते कोणत्या करिष्म्यामुळे, एकही भाजपाई सांगताना दिसत नाही आणि भ्रष्टाचाराने बरबटलेली काॅंग्रेस तर इडीच्या भितीने चकार शब्द काढायला तयार नाही,कोणताही योग्य मुद्दा नाही, देशपातळीवर चमकेल असे नेतृत्व नाही, संगठण रसातळाला गेले आहे.जे मोदी करतात, त्याची काॅपी काॅंग्रेस करते. राहूल गांधी तर सध्या हिंदू धर्मावर भाषण झाडताना दिसतात. उत्तर प्रदेशात आणि कर्नाटकमध्ये हिजाबचा मुद्दा घेऊन ओवेशी बरोबर छूपी मैत्री करून सत्ता मिळवायची, उत्तरप्रदेशात बहूजन समाज पार्टीच्या मायावतींनी केलेल्या भ्रष्टाचाराची भिती घालून प्रचारात उतरू न देणे हे समजून घेणे अंत्यंत गरजेचे आहे.
कर्नाटकात माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या ह्यांनी केलेल्या विकासाविरोधी बोलायला एकही शब्द नसल्याने तिथे एखदाही मोदी यांनी त्यांचा अजेंडा असलेले वाक्य ‘सबका साथ,सबका विकास’ कुठे उच्चारले नाही. तिथे त्यांनी ‘टिपू सुलतान’ घेऊन काम केले आणि काॅंग्रेसला सत्तेबाहेर हूसकावून लावले.
प्रत्येक भारतीयांना माहीत आहे की, कोणत्याही धर्मापेक्षा संविधान उच्च आहे ,परंतू बाबासाहेबांचा फोटो पुढे करायचा, ओठात बाबासाहेबांचे आणि संविधानाचे नाव घेऊन भारतीयांना मूर्ख बनवायचे(?) आणि वैचारिक गुलाम बनवायचा डाव रचला आहे,तो लवकर समजून घेतला नाही तर, तुम्हांला कोणतेही अधिकार राहणार नाहीत.
(सदरचा लेख : लेखकाचे वैयक्तिक मत आहे.)

संबंधित बातम्या
घाणंद ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रविण कदम बिनविरोध
अजनाळे ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता
आटपाडी येथे भाजपाच्या वतीने महाविकास आघाडीचा पुतळा दहन करून आंदोलन