जतच्या संदेश मोटेची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ जत:

जत येथील राजे रामराव महाविद्यालयामध्ये शिक्षण घेणारा कु. संदेश रामचंद्र मोटे यांची अखिल भारतीय विद्यापीठ स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
संदेश रामचंद्र मोटे हा महाविद्यालयात बी.ए. भाग २ मध्ये शिक्षण घेत आहे. शिवाजी विद्यापीठ अंतर्गत झालेल्या आंतरविभागीय सायकलिंग स्पर्धेत उज्वल यश संपादन केल्यामुळे त्याची अखिल भारतीय विद्यापीठ स्पर्धेमध्ये निवड झाली आहे.
संदेश रामचंद्र मोटे याच्या निवडीमुळे तालुक्याचे व महाविद्यालयाचे नाव राष्ट्रीय स्तरावर झळकले आहे.त्याला महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.सुरेश पाटील प्रा. सिताराम चव्हाण, प्रा.दीपक कांबळे प्राअनुप मुळे यांचे मार्गदर्शन लाभले.