
अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क / जत :
श्री लक्ष्मीदेवी माध्यमिक विद्यालय खलाटी येथे आंतरशालेय क्रीडा स्पर्धा उत्साहात पार पडल्या.
बीआरसीचे तज्ञ मार्गदर्शक सुरेंद्र सरनाईक यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकासाबरोबरच शारीरिक व मानसिक विकास झाला पाहिजे, त्यासाठी खेळ अत्यावश्यक आहे. खेळामुळे मुलांमध्ये नेतृत्व गुण वाढीस लागतात, असे सुरेंद्र सरनाईक यांनी बोलताना सांगितले .
यावेळी खो-खो, कबड्डी, थाळीफेक ,गोळाफेक ,धावणे व मैदानी स्पर्धेत मुलांनी भाग घेऊन स्पर्धेत उत्साह निर्माण केला.यावेळी रांगोळी स्पर्धा घेण्यात आली.स्पर्धेचे नियोजन व संयोजन क्रीडा विभाग प्रमुख एस.एच.ओलेकर , पी.के.लवटे,गुळदगडे, अंबारी व्ही.आर. ,काशीराम कुंभार, व पिंटू खोत यांनी केले.मुख्याध्यापक एस. आर. सर्जे यांनी मार्गदर्शन केले.

संबंधित बातम्या
जत येथे शिवाजी विद्यापीठ सांगली विभागीय मैदानी स्पर्धांना सुरुवात
निंबवडे प्रीमियर लीग पर्व सहाचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष वैभवदादा पाटील यांच्या हस्ते संपन्न
राष्ट्रीय नेमबाजीत भांबुर्डीच्या रुद्राक्षला सुवर्णपदक