विद्यार्थ्यांनी काळानुसार बदलावे-प्रा.टी.ए.चव्हाण

माडगुळे येथे ग.दि.माडगूळकर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमधील दहावी-बारावी विद्यार्थ्यांना शुभचिंतन
नंदकुमार विभूते
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माडगुळे:

विद्यार्थ्यांनी काळानुसार बदलावे असे मत प्रा.टी.ए.चव्हाण यांनी माडगुळे येथे व्यक्त केले.ग.दि.माडगूळकर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमधील दहावी व बारावी विद्यार्थ्यांच्या शुभचिंतन कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते.
ते म्हणाले,मुलांनी शिक्षण घेताना कोणत्या क्षेत्राला फार मागणी आहे, त्याच क्षेत्राचा विचार करावा. कोणाच्या सांगण्यावरून कोणतेही क्षेत्र निवडू नये. स्वःताला ज्या क्षेत्राची आवड आहे, त्या क्षेत्रात आपण पदार्पण करावे व त्यातच प्रगती करावी.
कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या स्वागतपर गीताने करण्यात आली.कार्यक्रमाची प्रस्तावना ग.दि.मा. हायस्कूलचे मुख्याध्यापक ए.जी.पाटील यांनी केली.विद्यालयातील आजी-माजी विद्यार्थ्यांनी शाळेस ऑफिस कपाट ,साऊंड- सिस्टीम व ऑफिस कामासाठी राऊटर या भेटवस्तू दिल्या.साई रोपवाटिकेचे सौरभ विभूते यांनी शाळेस आपल्या मुलीच्या जन्माच्या आनंदाप्रित्यर्थ शाळेस घंटा भेट दिली.माजी विद्यार्थी कल्पेश नंदकुमार विभुते यांनी शाळेतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील ५ विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे किट वाढदिवसानिमित्त भेट दिले. शाळेतील आजी-माजी विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
गदिमा हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक व स्कूल कमिटीचे चेअरमन प्रा. एन.बी.विभुते यांनी या विद्यार्थ्याना भविष्यामध्ये आपल्याला एक सुजाण नागरिक म्हणून कसे घडता येईल याचे मौलिक मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना शुभाशिर्वाद दिले.
कार्यक्रमास युवा उद्योजक तुषार चव्हाण, नेताजी पाटील, प्रा. शैलेश विभुते, सचिन चव्हाण, संभाजी माने व इतर मान्यवर उपस्थित होते. तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते.कार्यक्रमाचे संयोजन प्रा.किशोर चांदणे यांनी केले. आभार टी.एस.पाटील यांनी मानले.