सुजाता देशमुख इतिहास विषयातून सेट परीक्षा उत्तीर्ण

मोहनराव पुजारी
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /आटपाडी :

विद्यापीठ अनुदान आयोग नवी दिल्ली संलग्नित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या वतीने आयोजित केलेल्या ३७ व्या राज्यस्तरीय प्राध्यापक पात्रता परीक्षा सेट ( SET) या परीक्षेत श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालय,आटपाडीची विद्यार्थिनी सौ.सुजाता सचिन देशमुख या इतिहास विषयातून सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत.
बीड येथील डाॅ.प्रशांत साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,औरंगाबाद येथे त्यांचे इतिहास विषयातून पीएच.डी.संशोधन सुरू आहे. सेट परीक्षेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विजय लोंढे, इतिहास विभाग प्रमुख प्रा.सदाशिव मोरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.मेजर पांडुरंग देशमुख,सौ.कुसुम देशमुख व कुटुंबियांचे सहकार्य मिळाले.
दि आटपाडी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्रअण्णा देशमुख, चेअरमन अमरसिंहबापू देशमुख, उपाध्यक्ष डाॅ.सुभाष कारंडे, सहसचिव हणमंत पवार, निरीक्षक अशोक चौगुले यांनी त्यांचे अभिनंदन केले.