माडगुळे विकास सोसायटीच्या चेअरमनपदी सोमनाथ विभुते, व्हाईस चेअरमनपदी गौतम झोडगे

नंदकुमार विभूते
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माडगुळे:

माडगुळे येथील माडगुळे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी सोमनाथ गंगाराम विभुते तर व्हाईस चेअरमनपदी गौतम निवृत्ती झोडगे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.
गेल्या महिन्यात २० तारखेस या सर्व सेवा सोसायटीची निवडणूक झाली होती.या निवडणुकीत राजेंद्रअण्णा देशमुख यांच्या नेतृत्वाखाली खंडोबा शेतकरी विकास आघाडीने बऱ्याच फरकाच्या मताने एक हाती सत्ता काबीज केली होती.या सोसायटीवर देशमुख गटाचे गेले ४० वर्ष एकहाती निर्विवाद वर्चस्व आहेे.
विरोधी गटाने या निवडणुकीवर काही कारणाने बहिष्कार टाकला होता. परंतु मतदाराने कोणतीही बंधने, आशा-अपेक्षा व कोणत्याही दमदाटीला बळी न पडता निर्भयपणे मतदान करून या शेतकरी विकास आघाडीला सोसायटीत काम करण्याची एकमुखाने पुन्हा एकदा सत्ता दिली.त्याचेच फळ म्हणून आज सर्वसामान्यांचा आवाज, तरुण, तडफदार व सर्वात मिळून-मिसळून वागणाऱ्या उमेदवारास चेअरमनपदाची खुर्ची बहाल केली. या खुर्चीवर काम करण्याची संधी दिली.
त्याचबरोबर त्यांचे साथीदार गौतम निवृत्ती झोडगे यांच्या गळ्यात व्हाईस चेअरमन पदाची माळ पडली.निवडीच्या कामी शासकीय यंत्रणेमार्फत तालुका देखरेख संघाचे चंदनशिवे ,सोसायटीचे सचिव मोकाशी, विष्णु कवठेकर यांच्या उपस्थितीत या निवडी पार पडल्या.निवडीनंतर चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचा शाल, श्रीफळ देऊन व फेटा बांधून सत्कार करण्यात आला.