मंत्री नवाब मलिक यांच्यावरील कारवाईवरुन जतमध्ये काँग्रेसकडून केंद्र सरकारचा निषेध!

अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ जत:

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईचा जत येथे तालुका काँग्रेस कमिटीकडून निषेध व्यक्त करण्यात आला. आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या आदेशानुसार जत तालुका काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आले.
कार्यकर्त्यांनी मार्केट कमिटी परिसरात केंद्र सरकारच्याविरोधात घोषणाबाजी केली.नबाब मलिक यांच्या अटकेचा निषेध करीत कारवाईवर संताप व्यक्त केला. केंद्र सरकार हे महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर सूड उगवण्यासाठी ईडीचा वापर करीत आहे. महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यावर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना अडचणीत आणले जात आहे.यासंदर्भात निषेध करत कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करून संताप व्यक्त केला.
यावेळी जत तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अप्पाराय बिराजदार, जि.म.बँकेचे संचालक सरदार पाटील, जि.प.सदस्य महादेव पाटील, सांगली जिल्हा ओबीसी सेलचे अध्यक्ष तुकाराम माळी, पं स. सदस्य दिग्विजय चव्हाण, मार्केट कमिटी संचालक अभिजीत चव्हाण, नगरसेवक संतोष कोळी, नगरसेवक नामदेव काळे, माजी नगरसेवक निलेश बामणे, फिरोज नदाफ उपस्थित होते.