आमदार गोपीचंद पडळकर यांची प्रमुख उपस्थिती : सभापती सौ.पुष्पाताई जयवंत(भाऊ) सरगर यांची माहिती
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /आटपाडी :
आटपाडी पंचायत समिती येथे सोमवार दिनांक २८ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत रोजगार हमी कामांची आढावा बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती सभापती सौ.पुष्पाताई जयवंत(भाऊ) सरगर यांनी दिली.
आमदार गोपीचंद पडळकर हे महाराष्ट्र राज्य रोजगार हमी योजनेच्या समितीचे सदस्य आहेत.त्यांच्या प्रमुख उपस्थितीत आटपाडी तालुक्यातील सर्व रोजगार हमी योजनेच्या कार्यान्वित विभागांच्या कामांचा आढावा घेण्यात येणार आहे.
आटपाडी तालुका हा दुष्काळी तालुका आहे. या तालुक्यातील प्रत्येक गावातील सार्वजनिक कामे, शेतकऱ्यांची शेतीविषयक अनेक प्रकारची कामे व नागरिकांची वैयक्तिक अनेक प्रकारचीही रोजगार हमी योजनेअंतर्गत बऱ्याच प्रमाणात कामे होऊ शकतात. त्याकरिता आटपाडी तालुक्यातील सर्व लोकांचे व गावातील गावस्वरूपी कामांचे प्रश्न मार्गी लागतील, या हेतूने आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आटपाडी पंचायत समिती येथे ही आढावा बैठक आयोजित करण्यात आलेली आहे.
या बैठकीकरिता आटपाडी तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य, गट विकास अधिकारी,सहाय्यक गट विकास अधिकारी,आटपाडी पंचायत समिती रोजगार हमी विभागाचे सर्व अधिकारी व स्टाफ, तालुक्यातील सर्व सरपंच, ग्रामसेवक ,रोजगार सेवक, तसेच आटपाडी तालुका कृषी विभागाचे सर्व अधिकारी, सामाजिक वनीकरण व वन विभाग या विभागाचे सर्व अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित राहणार आहेत, असे सभापती सौ.पुष्पाताई जयवंतभाऊ सरगर यांनी सांगितले.

संबंधित बातम्या
घाणंद ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रविण कदम बिनविरोध
अजनाळे ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता
आटपाडी येथे भाजपाच्या वतीने महाविकास आघाडीचा पुतळा दहन करून आंदोलन