आमदार गोपीचंद पडळकर यांच्या निधीतून दुष्काळी आटपाडी तालुक्यात विकासकामांचा महापूर!: युवा नेते जयवंत(भाऊ) सरगर
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /आटपाडी :
बरेच वर्षे दुष्काळाच्या खाईत लोटलेल्या व विकासापासून वंचित असलेल्या आटपाडी तालुक्यातील सर्वसामान्य, गोरगरीब जनतेचे नेतृत्व म्हणून बहुजन हृदयसम्राट आमदार गोपीचंद पडळकर विधान परिषदेत गेले.आजपर्यंत महाराष्ट्रातील गोरगरीब, आधार नसलेल्या जनतेचे आधारवड बनले आणि आता त्यांच्या स्थानिक विकास निधीतून विकासकामांचा महापूर आलेला आहे, असे गौरवोद्गार युवा नेते जयवंतभाऊ सरगर यांनी ‘प्रगल्भनायक’शी बोलताना काढले.
ते पुढे म्हणाले,आटपाडी तालुक्यातील जनता विकासकामे मागण्याकरिता अनेक नेत्यांकडे जायची, परंतु त्यांची विकासकामे होत नव्हती. बरीच वर्षे प्रलंबित असणारे प्रश्न आमदार गोपीचंद पडळकर यांनी मार्गी लावले आहेत.
‘आमदार आपल्या दारी’ या संकल्पनेतून आटपाडी तालुक्यातील प्रत्येक गावात विकासात्मक कामाकरिता निधी दिला.
१) आटपाडी येथील वडार समाजाकरिता २५ लाख रुपयांचा सभामंडपाकरिता निधी देण्यात आला.
२) कौठुळी येथील बरीच वर्षे प्रलंबित असणारा कौठुळी गावातून माण नदीकडे जाणाऱ्या वस्तीकडे लोकांना व शेतकऱ्यांना ये-जा करता येत नव्हते. त्या रस्त्यावर पुलाकरिता १९ लाख रुपयांचा निधी मंजूर केला.
३) आटपाडी येथील होलार समाज बांधवांनी निधीकरिता सर्व नेत्यांकडे मागणी केली होती.परंतु त्यांना कोणीही निधी दिला नाही. सभामंडपाकरिता १० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला.
४) मौजे माडगुळे येथे बौद्ध समाज मंदिराकरिता १० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला.
अशा पद्धतीने अनेक चांगल्या प्रकारची कामे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या स्थानिक विकास निधीतून होत आहेत. त्यामुळे दुष्काळी आटपाडी तालुक्यात आमदार गोपीचंद पडळकर यांच्या ‘आमदार आपल्या दारी’ या संकल्पनेतून विकासकामांचा महापूर आल्याची वस्तुस्थिती आहे,असे जयवंतभाऊ सरगर म्हणाले.

संबंधित बातम्या
घाणंद ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रविण कदम बिनविरोध
अजनाळे ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता
आटपाडी येथे भाजपाच्या वतीने महाविकास आघाडीचा पुतळा दहन करून आंदोलन