नेलकरंजी येथील समीर मुलाणी सेट परीक्षा उत्तीर्ण

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क / आटपाडी :
नेलकरंजी (ता. आटपाडी) येथील समीर दिलावर मुलाणी यांनी सहायक प्राध्यापक पदासाठी घेण्यात आलेल्या सेट परीक्षेत इंग्रजी या विषयात प्रथम प्रयत्नात यश मिळवले. ही परीक्षा सप्टेंबर महिन्यात घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल शुक्रवारी सायंकाळी जाहीर झाला. यात समीर मुलाणी यांनी यश संपादन केले. त्यांना प्रा. राजेंद्र अशोक प्रधान यांचे मार्गदर्शन लाभले.या अगोदर समीर केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा व महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.