निंबवडे येथील देविदास अनुसे यांना मुंबई विद्यापीठाची पीएच डी!

मोहनराव पुजारी
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /आटपाडी:

अनुसेवाडी निंबवडे येथील शेतकरी कुटुंबातील देविदास गोपाळ अनुसे यांनी रसायनशास्त्र विषयात मुंबई विद्यापीठाची पीएच डी पदवी प्राप्त केली आहे. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय नियतकालिकातून त्यांचे शोधनिबंधही प्रकाशित आहेत.
त्यांचे दहावी पर्यंतचे शिक्षण निंबवडे येथे झाले. अकरावी व बारावीचे शिक्षण आटपाडी येथे घेतले. बारावी नंतर ते बी एस्सी व एम एस्सी पुणे विद्यापीठात प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. मुंबई विद्यापीठात पीएच डीसाठी प्रवेश घेतला व पीएचडी प्राप्त केली.
अत्यंत बिकट परिस्थितीत असताना परिस्थितीवर मात करून हे यश संपादन केले आहे. त्यामुळे सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांसमोर एक आदर्श देविदास अनुसे यांनी घालून दिला.
नेहमीच त्यांना त्यांच्या आईवडिलांचे बहिणीचे मार्गदर्शन लाभले आहे. तसेच त्यांचे गुरुवर्य डॉ.रमेश श्रीरंग यमगर, डॉ.दिपक विठ्ठल पिंजारी यांचे मार्गदर्शन लाभले आहे.नेहमी विद्यार्थ्यांच्या मदतीला धावून जाणारे व्यक्तीमत्व असा त्यांचा नावलौकिक आहे.