कॉग्रेस सेवादलच्या जत तालुकाध्यक्षपदी मोहन माने-पाटील यांची निवड

अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क / जत :

जत येथील मोहन माने-पाटील यांची कॉग्रेस सेवादलच्या जत तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. सांगली येथे झालेल्या एका कार्यक्रमात मंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्याहस्ते व काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष विशाल दादा पाटील, जयश्रीताई पाटील, आमदार विक्रमदादा सावत, सेवादल जिल्हाध्यक्ष अजित ढाेले यांच्या उपस्थितीत निवडीचे पत्र देऊन सत्कार करण्यात आला.
मोहन माने-पाटील यांनी यापूर्वीही तालुका सेवादलाची धुरा समर्थपणे सांभाळली आहे. तसेच जत शहर युवा काँग्रेस अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. विविध सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रात त्यांचा हिरीरीने सहभाग असतो. रक्तदान शिबीर, जयंती, उत्सव, मार्गदर्शन शिबीरे त्यांनी राबवली आहेत. मध्यंतरी ते राष्ट्रवादीत सामील झाले होते. ते पुन्हा स्वगृही परतले आहेत.
त्यांना निवडीचे पत्र देण्याच्या कार्यक्रमात मध्यवर्ती बँकेचे संचालक व जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील, पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण, बाबासाहेब काेडग, काँग्रेसचे कार्याध्यक्ष नाना शिंदे, जत नगर परिषदेचे गटनेते साहेबराव काेळी, निलेश बामणे, संताेष पाटील, माैला मणेर, अ्शाेक बन्नेनावर, महादेव काेळी, आण्णासाहेब गायकवाड, अभिजीत चव्हाण, ,मारूती पवार मिथून माने, विकास माने, मास्टर काळे उपस्थित होते.
मोहन माने-पाटील बोलताना म्हणाले की, आमदार विक्रमदादा सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली जत तालुक्यात काँग्रेसची पक्ष बांधणी जोरदारपणे करून पक्ष वाढीसाठी प्रयत्न करू.