‘भावानं पुढच्या डावासाठी घेतली माघार,ताईचा संपूर्ण गावात होतोय जय जयकार!

संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ माळशिरस:

माळशिरस नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२२ मध्ये नवीन वर्षात पुन्हा एकदा सबका साथ, सबका विकास या तत्त्वानुसार भारतीय जनता पार्टीचे डॉ.आप्पासाहेब देशमुख (प्रदेश उपाध्यक्ष, भाजपा ओबीसी मोर्चा महाराष्ट्र राज्य) यांची बहिण अपक्ष उमेदवार ताई वावरे यांना स्वतःच्या भावाला निवडणूकीच्या रिंगणातून माघार घ्यायला लावत एकप्रकारे आपल्या बहिणीला बिनविरोध निवडणूक करुन भाऊबीजची ओवाळणी म्हणून भेट दिली. यामध्ये देशमुख यांनी आपल्या मुरब्बी राजकीय डावाचे चांगलेच दर्शन घडविले आहे. त्यांच्या या डावाला विरोधक नक्कीच बळी पडल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे नगरपंचायत निवडणुकीत ‘भावानं पुढच्या डावासाठी घेतली माघार,ताईचा संपूर्ण गावात होतोय जय जयकार!’ या चर्चेला उधाण आलं आहे. बहिणीला अपक्ष, बिनविरोध करणारे खरे किंगमेकर डॉ.आप्पासाहेब देशमुख यांनी राजकारणाच्या पलीकडे जाऊन भावनिक नातंही तितक्याच पध्दतीने जपत माणूसकीपुढे व नात्यापुढे राजकारण मोठं नसतं हे दाखवून दिलं.
माळशिरस शहरातील सुज्ञ मतदार बंधू भगिनीनाही माहित आहे की, आपल्या शहरात अनेक पक्ष, आघाडी असूनही नागरिकांच्या गरजा, शहरातील समस्या या सर्वांचे निवारण करणारा एकमेव पक्ष म्हणजे भाजप व सर्वात महत्वाचे डॉ.आप्पासाहेब देशमुख यांचा कर्तव्यदक्षपणा! याच माळशिरस शहरात पुन्हा भारतीय जनता पार्टीचा विजयाचा झेंडा फडकवण्याचा निर्धार आप्पासाहेब देशमुख यांनी केला आहे.
“माळशिरसची जनता नेहमीच भाजपच्या पाठीशी राहिली आहे. तालुक्यात कमळ फुलवण्याचे काम माळशिरसकरांनी केली आहे. त्यामुळे यंदादेखील माळशिरस नगर पंचायतीमध्ये भाजपच फुलणार आहे. ते देखील बहुमताने! त्यामध्ये अपक्ष उमेदवार ताई वावरे या माळशिरस नगरपंचायतीमधील एकमेव बिनविरोध उमेदवार आहेत. त्यामुळे विरोधकांनी त्यांचं संख्याबळ वाढलं असा समज करून घेऊ नये. बहिणीसाठी भाऊ जागा बिनविरोध सोडत असेल तर भावावर वेळ आल्यानंतर बहिणदेखील त्याच तत्परतेने भावाच्या पाठीशी उभा राहील यात कोणतीही शंका नाही, याची मला खात्री आहे. त्यामुळे विरोधकांनी विनाकारण आपले बिना आवाजाचे फटाके फोडून वेळ वाया घालवू नये.” डॉ.आप्पासाहेब देशमुख,भाजप नेते,माळशिरस