महिलांचा मोठ्या प्रमाणात प्रवेश!
अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले या पक्षात अश्विनी देवकते, विद्या चव्हाण, महादेवी कांबळे,सुनिता ऐवळे,सखुबाई ऐवळे,सावित्री ऐवळे, सुनंदा सबरद यांनी प्रवेश केला.
जिल्हा अध्यक्ष संजय कांबळे यांचे जत शहर व तालुक्यात, जिल्ह्यात गोरगरीब जनता, शेतकरी, महिलावर्ग, नोकरदार, यांच्यासाठी काम करण्याची धडपड व तळमळ पाहून तसेच त्यांच्या कार्यास प्रेरित होऊन, आम्ही समस्त महिला वर्गाबद्दलचा आदर पाहुन आम्ही संजय कांबळे यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केला. यापुढे तालुक्यातील महिला, तरुणी यांच्यावर होणारे अन्याय पक्षाच्या माध्यमातून दूर केले जातील. तसेच पंचायत समिती ,जिल्हा परिषदमधील महिला संदर्भात असणाऱ्या योजना, रोजगार, स्वयंरोजगार बाबत जनजागृती करून महिलांची उन्नती होईल अशा पद्धतीचे काम आमच्या हातून होईल, असे प्रवेशाच्या वेळी बोलताना महिलांनी व्यक्त केले.
महिला बचत गट, नगरपालिका, पंचायत समिती,जिल्हा परिषद तसेच शासकीय विविध योजना, महामंडळे यांच्याकडून महिलांना आर्थिक मदत व छोट्या-मोठ्या उद्योगांसाठी लागणारी मदत पक्षाच्यावतीने मार्गदर्शन शिबीर घेऊन तालुक्यातील महिलांचा आर्थिक दर्जा सुधारण्यासाठी आमच्या परीने सर्व ती मदत केली जाईल, असे जिल्हाध्यक्ष संजय कांबळे यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष विकास काका साबळे, वैद्यकीय सेलचे जिल्हा अध्यक्ष मोहसीन इनामदार, युवक जिल्हा कार्याध्यक्ष हेमंत चौगुले, तालुका कार्याध्यक्ष विनोद कांबळे ,शंकर वाघमारे, विलास बाबर, इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित बातम्या
घाणंद ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रविण कदम बिनविरोध
अजनाळे ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता
आटपाडी येथे भाजपाच्या वतीने महाविकास आघाडीचा पुतळा दहन करून आंदोलन