जतमध्ये मोफत सर्वरोग निदान शिबीरास सुरुवात

डॉ.पतंगरावजी कदम यांची जयंती व डॉ.विश्वजीत कदम यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन
अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:

डॉ. पतंगरावजी कदम यांच्या जयंतीनिमित्त व मंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या वाढदिवसानिमित्त भारती विद्यापीठ वैद्यकीय दंत व नर्सिंग महाविद्यालय व रुग्णालय सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने भारती विद्यापीठ मुलींचे वस्तीगृह जत येथे आ.विक्रमसिंह सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत सर्वरोग निदान शिबीरास सुरुवात करण्यात आली. तालुक्यातील ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेला वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हावेत, या हेतूने आमदार सावंत यांच्या संकल्पनेतून या शिबीराचे आयोजित करण्यात आले होते. यावेळी भारती विद्यापीठ वैद्यकीय दंत व नर्सिंग महाविद्यालय व रुग्णालय सांगली येथील वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी येणाऱ्या रुग्णांची तपासणी केली. यावेळी जत शहरासह तालुक्यातील रुग्णांनी या आरोग्य शिबीरास चांगला प्रतिसाद दिला.
यावेळी प्रांताधिकारी जोगेंद्र कट्यारे, तहसिलदार जीवन बनसोडे, माजी सभापती बाबासाहेब कोडग, काँग्रेस तालुका अध्यक्ष आप्पाराया बिरादार, कार्याध्यक्ष सुजय नाना शिंदे, विक्रम फाउंडेशनचे अध्यक्ष युवराज निकम, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष संजय कांबळे, पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अभिजित चव्हाण, नगरसेवक राजू यादव, इरांणा निडोणी माजी सरपंच मारुती पवार,सामाजिक कार्यकर्ते नाथा पाटील,आदि मान्यवर उपस्थित होते.