जेष्ठ नागरिकांना जत तालुक्यात आजपासून लसीचा बुस्टर डोस : डाॅ. संजय बंडगर

अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क / जत :

जत तालुक्यातील ग्रामीण रूग्णालयात व सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात आजपासून जेष्ठ नागरिकांना बुस्टर डोस देण्यात येणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. संजय बंडगर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
जत तालुक्यातील ज्यांचे वय साठ वर्षापेक्षा जास्त आहे व ज्यांनी यापूर्वी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत व दोन्ही लसीचे डोस घेऊन त्यांना नव्वद दिवस होऊन गेले आहेत,अशा जेष्ठ नागरिकांना हा डोस घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
जेष्ठ नागरिकांची यादी तयार करण्यात आली असून ही यादी तालुक्यातील ग्रामीण रूग्णालयात व प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आली आहे. आरोग्य विभागाचे वतीने जेष्ठ नागरिकांना संपर्क करण्यात येईल. त्यांची नोंदणी करून घेऊन त्यांना कोरोना प्रतिबंधात्मक बुस्टर डोस देण्यात येईल,असे डाॅ. बंडगर यांनी सांगितले.