माळशिरस येथील श्रीनाथ विद्यालयात सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त किशोरी हितगुज मेळावा

संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ माळशिरस:

माळशिरस येथील श्रीनाथ विद्यालय व ज्युनियर कॉलेजमध्ये सावित्रीबाईं फुले जयंती बालिका व महिला शिक्षण दिन म्हणून साजरी करण्यात आली. यानिमित्त किशोरी हितगुज मेळावा साजरा करण्यात आला.
सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन डॉ.मयुरा सोनवलकर (वैद्यकीय अधिकारी,माळशिरस) यांच्या हस्ते करण्यात आले.विद्यालयातील मुली ‘सावित्रीच्या लेकी’ वेगवेगळे पोशाख परिधान करुन आल्या होत्या.यावेळी मुलींकडून बालिका दिन प्रतिज्ञा म्हणून घेण्यात आली.
डॉ.मयुरा सोनवलकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.मुलींना आरोग्य विषयक व बेटी बचाव, बेटी पढाओ जबाबदारी यासंबंधी मार्गदर्शन केले.पहिली महिला शिक्षिका म्हणून ज्यांना मान मिळाला त्यांचे विचार आचरणात आणले पाहिजेत.आज घरोघरी सावित्रीच्या लेकी घडल्या पाहिजेत, असे म्हणाल्या.
याप्रसंगी प्राचार्य योगेश गुजरे, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.