तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याची पंतप्रधानांची घोषणा

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /दिल्ली:
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील तीनही कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा आत्ताच केली आहे. सकाळी नऊ वाजता त्यांनी जनतेला संबोधित करताना ही घोषणा गेली. आंदोलक शेतकऱ्यांना आंदोलन मागे घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.
शेतकऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेऊन आता आपापल्या घरी जावे असेही आवाहन केले आहे.संसदच्या पुढील अधिवेशनात तीनही कायदे मागे घेणार असल्याची घोषणा त्यांनी केली.

गेल्या वर्षभरापासून या कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. यामध्ये अनेक बैठका घेण्यात आल्या. मात्र यातील कोणत्याही बैठकीला यश आले नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केलेली आहे. शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आवाहन केले आहे.
‘पंजाब आणि उत्तर प्रदेशातील निवडणुका येऊ घातल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर ही घोषणा केल्याचे बोलले जात आहे. उत्तर प्रदेशाची निवडणूक ही भाजपसाठी महत्त्वाची असून भाजपने या बाबतचा भाजपने सर्वेही केला आहे. कृषी कायद्यावर या ठिकाणी असलेला शेतकरी वर्ग नाराज असल्याचे दिसून आलेला आहे. येथील शेतकरी संघटना ताकदवान आहेत. म्हणून हे आशादायक वक्तव्य करण्यात आलेले आहे. मोदी यांनी आतापर्यंत असा कोणताही निर्णय परत घेतलेला नाही. मात्र शेतकरी आणि विरोधी पक्षांच्या दबावामुळे हा निर्णय मागे घेतला असल्याचे व उत्तर प्रदेशच्या प्रचाराचा नारळ मोदींनी फोडला आहे, असं म्हणता येईल. सरकारची प्रतिमा देशभरात त्याचबरोबर विदेशातही नजरेसमोर आली आहे. संघटना मागे घेण्यास तयार नसल्यामुळे सरकारने हा विचार केला आहे, मागे घेणार म्हणजे नेमकं काय करणार हे अजूनही स्पष्ट नाही. भाजप कृषी कायद्याच्या मुद्द्यावरून बॅकफूटवर गेलेले आहे.’ अशा प्रतिक्रिया रामराजे शिंदे यांनी दिल्या आहेत.
“उशिरा का होईना पण पंतप्रधानांनी हा चांगला निर्णय घेतला. यामध्ये अनेक शेतकऱ्यांना जीव गमवावा लागला. अतिशय संयमाने शेतकर्‍यांनी हा लढा दिला. सरकारमध्ये बहुमत असतानाही केंद्र सरकारला शेतकऱ्यांपुडे झुकावे लागले आणि केंद्र सरकारला हा निर्णय घ्यावा लागला” अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी दिली आहे.
“शेतकऱ्यांनी जे आंदोलन केले आहे, त्याचा विजय झाला आहे” अशी प्रतिक्रिया मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.

या घोषणेबाबत देशभरातून अनेक संघटना, नेते व शेतकरी यांच्यामधून विविध प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी कृषीविषयक तिन्ही कायदे मागे घेणार म्हणजे नेमकेेे काय करणार? असाही प्रश्न उपस्थित केला आहेे.